शिक्षकांनी ‘अपडेट’ असावे - मोरे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 ऑगस्ट 2018

पुणे - फक्त अभ्यासक्रम बदलल्यानंतर शिबिराचे आयोजन न होता, अशा शिबिरांचे आयोजन वर्षातून अनेक वेळा व्हावे. इतकेच नव्हे तर हिंदी भाषेचेच शिबिर न होता, इतर भाषांचेसुद्धा व्हावे. बाजारात ज्याप्रमाणे व्यापारी नवीन वस्तू आल्यानंतर स्वतःला अपडेट ठेवतात, त्याप्रमाणे शिक्षणाच्या बाजारातसुद्धा शिक्षकरूपी व्यापारी अपडेट असला पाहिजे, असे सूचक वक्तव्य शिक्षणाधिकारी डॉ. गणपत मोरे यांनी केले.

टिळक अध्यापक विद्यालयात,पुणे जिल्हा हिंदी अध्यापक संघाच्या शिबिरात ते बोलत होते. या प्रसंगी संघाचे अध्यक्ष विठ्ठल शिंदे, प्राचार्य राधिका इनामदार आदी उपस्थित होते. व्याकरण तज्ज्ञ व्याख्यात्या डॉ. नीला बोरवणकर म्हणाल्या, ‘‘कोणत्याच विषयाचे व्याकरण हे क्‍लिष्ट नसून, ते अगदी हसत खेळत मुलांमध्ये रुजवू शकता. मात्र, त्यासाठी वेगवेगळ्या क्‍लृप्त्या शिक्षकांना आत्मसात कराव्या लागतील. काही विद्यार्थी तर व्याकरणाचा धसकाच घेतात. इतकेच नव्हे तर काही शिक्षकही नको तेवढा अभ्यास करून वर्गात जातात. हिंदी भाषा ही उच्चारणावर अवलंबून असून, त्यासाठी तुमच्या उच्चारणात सुधारणा होणे गरजेचे असते.’’ डॉ. अलका पोतदार, रंजना पिंगळे, वृंदा कुलकर्णी या हिंदी पाठ्यपुस्तकाच्या निर्मितीत सहभाग असलेल्या व्यक्‍तींनीही या वेळी मार्गदर्शन केले. 

पुणे जिल्हा हिंदी अध्यापक संघाचे संस्थापक पी. ई. कुलकर्णी, ए. बी. मर्चंट, संघाच्या सचिव अनिता चौधरी यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले होते.

Web Title: teacher student educatiion ganpat more