विद्यार्थ्याच्या मारहाणप्रकरणी शिक्षकाला अटक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 नोव्हेंबर 2018

पुणे - गृहपाठ न केल्याबद्दल सहावीच्या विद्यार्थ्याला मारहाण केल्याप्रकरणी शिक्षकाला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली असून, त्याला १५ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. 

शिवाजीनगरमधील श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी स्कूलमधील (एसएसपीएमएस) सहावीत शिकणाऱ्या ११ वर्षांच्या विद्यार्थ्याला बेदम मारहाण केल्याच्या आरोपावरून चित्रकला शिक्षक संदीप विनायक गाडे (वय ४१, रा. जांब, ता. इंदापूर) याला अटक झाली आहे. बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम) कायद्यान्वये आणि मारहाणीबद्दल त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. शाळा प्रशासनाने शिक्षकाला निलंबितही केले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चित्रकलेचा गृहपाठ पूर्ण केला नाही म्हणून गाडेने विद्यार्थ्याला मारहाण केली होती. १५ ते २५ ऑक्‍टोबर दरम्यान शाळेत हा प्रकार घडला होता. विद्यार्थ्याचे पालक त्याला नेण्यासाठी तीन नोव्हेंबर रोजी आले होते. त्यावेळी विद्यार्थ्याला बोलताना त्रास होत असल्याचे दिसून आले. तसेच झोपही लागत नव्हती. पालकांनी त्याला डॉक्‍टरांकडे नेले, तेव्हा अर्धांगवायूचा झटका बसल्याची शक्‍यता डॉक्‍टरांनी वर्तविली होती. पालकांनी विचारणा केल्यावर त्या मुलाने शिक्षकांनी मारहाण केल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांकडे तक्रार दिल्यावर शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून, गाडेला अटक केली.

Web Title: teacher was arrested in the student beating crime