शिक्षकभरतीचे धोरण तयार करणार 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 ऑगस्ट 2019

पुणे महापालिकेच्या शाळांमध्ये कंत्राटी शिक्षकभरतीत झालेल्या घोळामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. हा घोळ यापुढे होऊ नये, यासाठी शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन शिक्षकभरतीचे धोरण तयार केले जाईल, असे  आश्‍वासन महापौर मुक्ता टिळक यांनी दिले. 

पुणे - पुणे महापालिकेच्या शाळांमध्ये कंत्राटी शिक्षकभरतीत झालेल्या घोळामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. हा घोळ यापुढे होऊ नये, यासाठी शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन शिक्षकभरतीचे धोरण तयार केले जाईल, असे  आश्‍वासन महापौर मुक्ता टिळक यांनी दिले. 

पुणे महापालिकेच्या शाळांमध्ये शिक्षकांचा अभाव, भरतीतील गोंधळ, यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.  याकडे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे ‘सकाळ’ने वृत्तमालिकेच्या माध्यमातून प्रकाशझोतात आणले होते. महापालिकेच्या शाळांमधील बहुतांश विद्यार्थी हे झोपडपट्टी व गरीब घरातील असताना त्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण देणे, ही पालिकेची जबाबदारी आहे. पण, याचे अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही. (ताज्या बातम्या मोबाईलवर मिळवा, 'सकाळ'चे App डाऊनलोड करा)

याबाबत महापौर म्हणाल्या, ‘‘महापालिकेच्या विनाअनुदानित शाळांसाठी शिक्षकभरतीची प्रक्रिया शाळा सुरू होण्यापूर्वी करणे योग्य नाही. ती एप्रिल-मे महिन्यातच पूर्ण होऊन पहिल्या दिवशीच हे शिक्षक आले पाहिजेत. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी शिक्षकभरतीचे धोरण तयार केले जाईल. ’’

राज्यात व महापालिकेत भाजपची सत्ता आहे. पण, सरकारकडून त्यांना पदे भरता आलेली नाहीत. कंत्राटी शिक्षकांची भरती वेळेवर केली जात नाही. सत्ताधारी आणि प्रशासनात समन्वय नसल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. यासाठी आयुक्तांची भेट घेऊन चर्चा केली जाईल. 
- दिलीप बराटे,  विरोधी पक्षनेता, महापालिका


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: teacher will recruitment policy