esakal | कोविडच्या कामाबाबत शिक्षक संघटनांकडून मोठी मागणी 
sakal

बोलून बातमी शोधा

corona1

कोविड उपचार केंद्र व विलगीकरण केंद्रावर सलग 15 दिवसांहून अधिक काळ काम केलेल्या शिक्षकांना या कामातून कार्यमुक्त करावे, अशी मागणी कै. शिवाजीराव पाटील प्रणित महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे सरचिटणीस केशवराव जाधव यांनी केली आहे. 

कोविडच्या कामाबाबत शिक्षक संघटनांकडून मोठी मागणी 

sakal_logo
By
मिलिंद संगई

बारामती (पुणे) : कोविड उपचार केंद्र व विलगीकरण केंद्रावर सलग 15 दिवसांहून अधिक काळ काम केलेल्या शिक्षकांना या कामातून कार्यमुक्त करावे, अशी मागणी कै. शिवाजीराव पाटील प्रणित महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे सरचिटणीस केशवराव जाधव यांनी केली आहे. 

पुण्यात रेल्वेे, विमान, रिक्षा, कॅबला परवानगी, पण पीएमपीला

याबाबत केशवराव जाधव यांनी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे मागणी केल्याची माहिती बारामती तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष हनुमंत शिंदे व सरचिटणीस सुरेंद्र गायकवाड यांनी दिली. तसेच, कोव्हिड उपचार केंद्रावर नियुक्त कर्मचाऱ्यांना 24 तास काम न देता सकाळी 8 ते सायंकाळी 8, असे 12 तासांचे काम सहा तासांच्या दोन टप्प्यात द्यावे, तसेच नियुक्त कर्मचाऱ्यांना सुरक्षिततेच्या दृष्टीने संपूर्ण मेडिकल किट, मास्क, सँनिटायझर, हॅन्डग्लोव्हज हे साहित्य पुरवावे. त्यांना विमा संरक्षण देण्यात यावे, अशीही मागणी केशवराव जाधव यांनी केली आहे.

यंदा डाळिंबाचा नाद करायचा नाय

दरम्यान, बारामती तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांना कोव्हिड उपचार केंद्र रुई व मेडिकल कॉलेज बारामती विलगीकरण केंद्र येथील कामातून कार्यमुक्त करणेसंदर्भात बारामती तालुका प्राथमिक शिक्षक संघाने बारामती पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राहुल काळभोर व गटशिक्षणाधिकारी संजय जाधव यांना निवेदन दिले. या वेळी बारामती तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे महादेव गायकवाड, अध्यक्ष हनुमंत शिंदे, सरचिटणीस सुरेंद्र गायकवाड, संपर्कप्रमुख रेवणनाथ परकाळे, सल्लागार उत्तम जगताप, बाळासाहेब नरुटे, अविनाश भोसले, शरद भोई, त्रिंबक ताम्हाणे, बापू खरात आदी उपस्थित होते.