teachers working without pay warned to agitate in next 15 days
teachers working without pay warned to agitate in next 15 days

विनावेतन काम करणाऱ्या शिक्षकांचा येत्या १५ दिवसांत आंदोलन करण्याचा इशारा

पुणे : विनावेतन काम करणाऱ्या राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांवर लॉकडाऊनच्या काळात उपासमारीची वेळ आली आहे. वेतन देण्याबाबत सरकार वारंवार आश्वासन देत असले, तरी प्रत्यक्ष अंमलबजावणी मात्र होत नाही. परिणामी राज्यातील जवळपास साडे नऊ हजारांहुन अधिक शिक्षक हताश झाले आहेत. सरकारने येत्या १५ दिवसांत मागण्यांची पूर्तता न केल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने दिला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
राज्यातील उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांच्या एक हजार ७७९ शाळा, ५९८ तुकडया आणि एक हजार ९२९ अतिरिक्त शाखांवरील एकूण नऊ हजार ८८४ शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना एकूण वेतनाच्या २० टक्के निधी स्वरूप १०६ कोटी ७४ लाख ७२ हजार वित्त विभागाने मार्चमध्ये मंजूर केले आहेत. याप्रमाणे सर्वांना वेतन देण्यात यावे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

वाढीव पदांवर २००३-०४ ते २०१७-१८ पर्यंतच्या विनावेतन काम करणाऱ्या शिक्षकांना वेतन मिळावे, यासाठी या पदांना तात्काळ मंजूरी द्यावी. तसेच राज्यातील माहिती तंत्रज्ञान विषय शिक्षकांनाही वेतन मिळावे याकरिता सरकारने आदेश द्यावेत, या मागण्यांचे निवेदन महासंघाचे अध्यक्ष डॉ. संजय शिंदे यांनी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे दिले आहे.  


पुण्यात अडकलेले विद्यार्थी म्हणताहेत, 'कोरोनाऐवजी आम्ही उपासमारीने मरू'

सरकारी आदेश असतानाही २ मे २०१२ नंतर नियुक्त शिक्षकांना पदमान्यता व वेतन मिळत नसल्याने या शिक्षकांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक  विनावेतन काम करतात. लॉकडाऊनमुळे या शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे. तसेच मानसिक दृष्ट्या ते हतबल झाले आहेत. यापूर्वी महासंघासमवेत फेब्रुवारीमध्ये झालेल्या बैठकीत मागण्या मान्य करण्याचे आश्वासन सरकारने दिले होते. मात्र त्याला दोन महिने उलटून गेले, तरीही सरकारने अद्याप कोणत्याही हालचाली केलेल्या नाहीत. त्यामुळे सरकारने येत्या १५ दिवसांत मागण्याची पूर्तता करणारे आदेश न काढल्यास आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही महासंघाच्या वतीने सरचिटणीस प्रा. संतोष फाजगे यांनी दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com