आपत्ती व्यवस्थापन आराखड्यातील अधिकारी म्हणतात...

corona-j.jpg
corona-j.jpg

पुणे:  रेल्वे स्थानकावर दररोज किमान अकरा रेल्वे गाड्यांमधून उत्तरप्रदेश, बिहार, कर्नाटकसह परराज्यातून कामगारांसह इतर प्रवासी येत आहेत. वैद्यकीय पथकांमार्फत या प्रवाशांची तपासणी करून त्यांच्या हातावर 'होम क्वारंटाइन'चा शिक्का मारला जातो...शिवाय त्यांना आवश्यक खबरदारी घेण्याबाबत मार्गदर्शन केले जात आहे. आपत्कालीन परिस्थितीत आम्ही कर्तव्य बजावत असल्याचे समाधान वाटतेय...सहकार विभागाचे जिल्हा उपनिबंधक नारायण आघाव सांगत होते.  उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे यांच्याकडे खासगी रुग्णालयातील बेड्सच्या व्यवस्थापनाच्या नियोजनाची जबाबदारी आहे.

भागडे म्हणाले, ''कोणत्या खासगी रुग्णालयात किती बेड्स उपलब्ध आहेत, याची संबंधित रुग्णालयांकडून माहिती घेऊन डॅशबॉर्डवर अपडेट केली जाते. शहरात कोरोनासोबतच इतर व्याधीग्रस्त रुग्णांसाठी आयसीयू बेड्सची गरज भासते. ग्रामीण भागात आयसीयू बेड्स कमी आहेत. शिवाय इतर जिल्ह्यांतूनही येणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. त्यामुळे सध्या आयसीयू बेड्ची कमतरता जाणवतेय. परंतु ऑक्सिजन आणि ऑक्सिजनविरहित बेड्सची संख्या पुरेशी आहे.'' 

उपजिल्हाधिकारी आरती भोसले म्हणाल्या, ''जिल्ह्यातील ग्रामपंचायत, नगरपालिका क्षेत्रातील बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या किमान दहा ते बारा व्यक्तींचा शोध घेतला जातो. त्यांना होम क्वारंटाइन करण्यावर भर दिला जातो.  काहीजण माहिती लपवण्याचा प्रयत्न करतात. कोरोना बाधित असल्याचे सांगण्यास घाबरतात. परंतु अशा व्यक्तींनी स्वतःहून प्रशासनाला माहिती द्यावी. तसेच, कोणाच्या संपर्कात आल्याचे सांगितल्यास संसर्ग रोखण्यासाठी मदत होईल.'' आपत्ती व्यवस्थापन आराखड्यातील काही अधिकाऱ्यांनी त्यांना दररोज येणारा अनुभव 'सकाळ'कडे व्यक्त केला.

जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी उपाययोजना आखण्यात आल्या आहेत. कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेणे, त्यांना होम क्वारंटाइन करणे, सरकारी आणि खासगी रुग्णालयातील बेड्सच्या उपलब्धतेबाबत नियोजन, कंटेनमेंट झोन तयार करणे,  प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे अशा विविध बाबींसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी आपत्ती व्यवस्थापन आराखडा अंतर्गत महसूल विभागातील अधिकाऱ्यांसोबतच सहकार विभाग, कामगार उपायुक्त कार्यालय यासह अन्य कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मदत घेतली आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अधिकारी आणि त्यांच्यावर सोपविण्यात आलेली जबाबदारी : 
उपजिल्हाधिकारी आरती भोसले : जिल्ह्यातील ग्रामपंचायत, नगरपालिका क्षेत्रात बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या किमान दहा ते बारा व्यक्तींचा शोध घेऊन होम क्वारंटाइन करणे.
अविनाश हदगल उपजिल्हाधिकारी आणि संजीव देशमुख प्रादेशिक अधिकारी एमआयडीसी : 
कंटेनमेंट झोन तयार करण्याबाबत नियोजन आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे.
भारत वाघमारे आणि सुभाष भागडे उपजिल्हाधिकारी : 
सरकारी आणि खासगी रुग्णालयातील बेड्सच्या उपलब्धतेबाबत नियोजन करणे.
सुधीर जोशी उपजिल्हाधिकारी :  कोरोना तपासणीचा अहवाल प्रयोगशाळेतून 24 तासांत उपलब्ध व्हावा, यासाठी प्रयत्न करण्याबाबत नियोजन.
सुरेश जाधव, अतिरिक्त जिल्हाधिकारी (झोपडपट्टी पुनर्वसन) : जिल्ह्यातील कॅंटोन्मेंट परिसरातील रुग्णांची तपासणी आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना.
विकास पनवेलकर, कामगार उपायुक्त आणि जिल्हा उपनिबंधक नारायण आघाव : परजिल्ह्यातील आणि परराज्यातून रेल्वेने येणाऱ्या नागरिकांची वैद्यकीय पथकामार्फत तपासणी करून घेणे जिल्हा शल्य चिकित्सक यांच्यासोबत समन्वय आणि रेल्वे, बस किंवा इतर वाहनाने येणाऱ्या कामगारांची नोंद करून त्यांना होम क्वारंटाइन  करणे.

प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी असिस्टंट इन्सिडेंट कमांडर नियुक्त, मोबाईल क्रमांक :

सुनील कोळी, तहसीलदार हवेली- उरळी कांचन ते थेऊर आणि हडपसर मंडळ (8286333999)
सहाय्यक अधिकारी दिनेश अडसूळ 9421762569

सुवर्णा बारटक्के तहसीलदार संजय गांधी योजना हवेली
कोथरूड, खडकवासला आणि खेड शिवापूर मंडळ (9372416278)
सहायक अधिकारी आप्पासाहेब गुजर 
(9422567041)

रोहिणी आखाडे-फडतरे तहसीलदार संजय गांधी योजना पुणे शहर
कळस आणि वाघोली मंडळ
(9226373191)
सहाय्यक अधिकारी जाधव
(9422078501)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com