तंत्रनिकेतनची जागा घेऊ नका

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 ऑगस्ट 2019

तंत्रनिकेतनची जागा सरकारने ताब्यात घेऊ नये, यासाठी माजी विद्यार्थी संघटना आणि जीपीपी बचाओ शिष्टमंडळ समिती १४ ते २२ ऑगस्टपर्यंत आंदोलन करणार आहे. तसेच सरकार एकीकडे डिप्लोमा कॉलेज वाचावेत, म्हणून प्रयत्न करीत असताना तंत्रनिकेतनची जागा ताब्यात घेण्याचा निर्णय कसा काय घेऊ शकते, असाही प्रश्‍न आहे.
- यशराज पारखी, अध्यक्ष, माजी विद्यार्थी संघटना

पुणे - गणेशखिंड रस्त्यावरील शासकीय तंत्रनिकेतनची (जीपीपी) १०.६० हेक्‍टर जागा ताब्यात घेण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला माजी विद्यार्थ्यांनी विरोध केला. हा निर्णय मागे घ्यावा, या मागणीसाठी बुधवारपासून (ता.१४) कॉलेजच्या आवारात आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष यशराज पारखी यांनी सांगितले.

हिंजवाडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पासाठी राज्य सरकारकडून देण्यात येणारा निधी थेट न देता, पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणास (पीएमआरडीए) सरकारची जमीन हस्तांतरित करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला आहे. निर्णयांतर्गत शासकीय तंत्रनिकेतची जागा सरकार ताब्यात घेऊन प्राधिकरणास देणार आहे. मात्र, निर्णयास तंत्रनिकेतनच्या माजी विद्यार्थ्यांनी विरोध केला असून, बुधवारपासून ते आंदोलन करणार आहेत. 

या वेळी संघटनेचे उपाध्यक्ष अनंत पांचाळ, शिष्टमंडळ समितीचे अध्यक्ष जगदीश साठे आणि विद्यार्थी उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Technical place issue student agitation