तंत्रज्ञानामुळे भरीव कामगिरी - सी. विद्यासागर राव

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 एप्रिल 2018

पुणे - ‘‘परकीय शक्तींच्या अधिपत्यामुळे देशाचे आर्थिक, राजकीय आणि सामाजिक नुकसान झाले. मात्र, चार वर्षांत नरेंद्र मोदी सरकारने विविध क्षेत्रांत भरीव कामगिरी केली आहे. या काळात देशात सामाजिक, आर्थिक आणि राजकीय क्षेत्रात मोठे बदल झाले. तंत्रज्ञानाच्या मदतीने पारदर्शक आणि गतिमान कारभार करण्यावर या सरकारचा भर राहिला असून, नावीन्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून सामान्य जनतेचे जगणे अधिक सुखकर बनले आहे,’’ असे मत राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी व्यक्त केले.  

‘रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी’ व ‘यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा)’तर्फे आयोजित कार्यक्रमात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राव यांनी संवाद साधला. खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे आणि नीती आयोगाचे सदस्य धीरज नय्यर यांच्या ‘द इनोव्हेशन रिपब्लिक : गव्हर्नन्स इनोव्हेशन्स इन इंडिया अंडर नरेंद्र मोदी’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले.

यशदाचे महासंचालक आनंद लिमये, उपमहासंचालक प्रेरणा देशभ्रतार, प्रबोधिनीचे अध्यक्ष प्राचार्य अनिरुद्ध देशपांडे आणि महासंचालक रवींद्र साठे या वेळी उपस्थित होते. या पुस्तकाचे प्रकाशन राज्यपालांच्या हस्ते होणार होते. 

राव म्हणाले, ‘‘या पुस्तकात सरकारकडून राबविलेल्या १७ नवनवीन कल्पनांचा समावेश आहे. सरकारच्या १०० विभागांच्या उपक्रमांद्वारे आणि १७ क्षेत्रांतील नवकल्पनांवर हे पुस्तक आधारित आहे. सरकारच्या नव्या धोरणांमुळे देशाची प्रगती होत आहे. त्याचा अभ्यास आणि विश्‍लेषण झाले पाहिजे. स्वातंत्र्यानंतर देशातील सरकारने सातत्याने घेतलेल्या कल्याणकारी निर्णयांमुळे देशाचा विकास झाला आहे. सरकारने नोटाबंदी आणि वस्तू-सेवाकराची अंमलबजावणी हे दोन क्रांतिकारी निर्णय घेतले. त्याचा सर्वच समाजघटकांना त्रास सहन करावा लागला असला तरीही त्यामागील उद्देश कळल्यानंतर नागरिकांचा या निर्णयाला पाठिंबा मिळाला. भारताने अमेरिका, रशिया, ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिकन देशांशी धोरणात्मक भागीदारी बनविली आहे. इस्राईलच्या पंतप्रधानांच्या ऐतिहासिक दौऱ्यामुळे दोन राष्ट्रांमधील मजबूत भागीदारीसाठी नवीन मार्ग उघडला गेला आहे.’’ नय्यर यांनी मनोगत व्यक्त केले.

सरकारने लोकसहभागावर भर दिल्यामुळे सरकारच्या प्रक्रियेत सामान्य नागरिकांना सामावून घेण्यात आले आहे. त्याचा उपयोग देशाच्या विकासासाठी होत आहे. मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारच्या या चार वर्षांच्या कालखंडात शासकता व प्रशासकतेमध्ये वहिवाट सोडून वेगळ्या वाटेने जाण्याची वृत्ती वाढल्याचे दिसून येते. 
- डॉ. विनय सहस्रबुद्धे, खासदार

Web Title: technology c. vidyasagar rao