कृषी महाविद्यालयात तंत्रज्ञान महोत्सव

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 सप्टेंबर 2018

पुणे -‘‘शेतीमालाचे उत्पन्न वाढवण्यासाठी शेतकऱ्यांनी उत्पन्न आणि खर्च याचा ताळमेळ घातला पाहिजे. त्यासाठी उत्पादन खर्च कमी करण्याची गरज आहे,’’ असे मत महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष व खासदार संजय धोत्रे यांनी व्यक्त केले.

कृषी महाविद्यालयात आयोजित केलेल्या कृषी तंत्रज्ञान महोत्सवात धोत्रे बोलत होते. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, कृषी विस्तार शिक्षण विभाग आणि कृषी महाविद्यालयातर्फे शिवाजीनगर येथील कृषी महाविद्यालयात ‘कृषी तंत्रज्ञान महोत्सव : २०१८’चे आयोजन करण्यात आले होते. या वेळी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. पी. विश्‍वनाथा, माजी कुलगुरू डॉ. राजाराम देशमुख, विजय इंगळे, डॉ. किरण कोकाटे, 

डॉ. अशोक फरांदे, डॉ. शरद गडाख, डॉ. सुनील मासाळकर आदी उपस्थित होते. डॉ. विश्‍वनाथा म्हणाले, ‘‘शेती क्षेत्रामधील आव्हानांचा विचार करून कीड, रोग प्रतिकारक आणि पाणी व तापमान यांचा ताण सहन करू शकतील, असे वाण विकसित होण्याची गरज आहे. त्यामुळे शेतीचे उत्पन्न वाढू शकेल.’’

Web Title: Technology Festival in Agriculture College