लुटू खाऊची मजा; राखू दातांची निगा!  (व्हिडिओ)

लुटू खाऊची मजा; राखू दातांची निगा!  (व्हिडिओ)

धमाल सुटीची 
पुणे - उन्हाळ्याच्या सुटीत तऱ्हेतऱ्हेचा खाऊ उपलब्ध असतो. आंबे, कलिंगड, करवंदं खा, फळांबरोबरच आईस्क्रिमची मजा मनमुराद लुटूया; पण हे करताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, ती म्हणजे दातांचं आरोग्य राखलं तरच थंड व आंबट पदार्थही खाता येतात. यासाठी दंत शल्यचिकित्सक डॉ. नितीन बर्वे यांनी सांगितलेला मंत्र लक्षात घेऊया.

गारेगार आईस्क्रीम, कुल्फी, आंबे, आमरस, उसाचा रस, कैऱ्या, करवंदं हे पदार्थ बच्चे कंपनीच्या खूप आवडीचे; पण काहींना थंड किंवा आंबट पदार्थ खाल्ले की दातात ठणका सुरू होतो. हवेहवेसे पदार्थ समोर असूनही खाता येत नाहीत. ही वेळच यायला नको असेल, दाताचं आरोग्य टिकवायला हवं.

डॉ. बर्वे हे मुलांना शिबिरांमधून दातांचं आरोग्य जपण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स देत असतात. ते म्हणाले, ‘‘पालक मुलांना सांगतात की, चॉकलेट खाऊ नकोस, फार गार खाऊ नकोस तेव्हा मुलांना राग येऊ शकतो; पण पालक काळजीपोटीच असं सांगतात, हे मुलांनी समजून घ्यावं. पालकांनीसुद्धा मुलांचे दात चांगले असतील, तर त्यांना गारेगार पाणी पिणं, आईस्क्रीम व चॉकलेट खायला नकार देऊ नये. त्याचबरोबर दात रोज दिवसातून तीन वेळा योग्य प्रकारे स्वच्छ करायची सवय लावून घ्यावी. त्यात टंगळमंगळ केली तर दात दुखणं, किडणं हे आलंच. दात स्वच्छ केला नाही तर त्यावर जंतूंची वाढ होते. मात्र दात, हिरड्या व जिभेची नीट स्वच्छता ठेवली तर त्यांचं आरोग्य राखता येतं. आईस्क्रीम खाल्ल्यावर ताबडतोब नसलं तरी थोड्या वेळाने चूळ भरायला हवी. मुलं तसं करत नसल्यानं दातांवर  चिकट थर जमा होतो. काकडी, टोमॅटो, सफरचंद अननस, डाळिंब वगैरे चावून खाल्ल्यानं त्यांतील तंतूनी दातांवर  घासण्याची क्रिया परस्पर घडते. दर सहा महिन्यांनी दंत चिकित्सकांकडून दातांची तपासणी करून घ्यावी.’’

मुलांनो, हे करा... 
दात दिवसातून तीन वेळा योग्य प्रकारे स्वच्छ करावे.
तंतूमय भाज्या, फळं चावून खाल्ल्यानं दात स्वच्छ होतात. 
दर सहा महिन्यांनी दातांची तपासणी करून घ्यावी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com