दौंड - ऑनलाइन जुगार प्रकरणी सहा जणांना अटक

 ऑनलाइन जुगार प्रकरण : मोबाइल संचावरून मटक्याचे आकडे घेऊन हा अड्डा चालविला जात होता
Tejas Kamble incliding 6 persons arrested by police in online gambling case daund pune
Tejas Kamble incliding 6 persons arrested by police in online gambling case daund pune sakal

दौंड : दौंड शहरात ऑनलाइन जुगार प्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली आहे. दौंड पोलिसांनी ही कारवाई केली आहे. दौंड शहरातील शालीमार चौकात एका पत्र्याच्या शेड मध्ये सुरू असलेल्या ऑनलाइन मटका जुगार अड्ड्यावर धाड टाकण्यात आली. मोबाइल संचावरून मटक्याचे आकडे घेऊन हा अड्डा चालविला जात होता.

कारवाईत तेजस बाबासाहेब कांबळे (रा. सरपंच वस्ती, गोपाळवाडी रस्ता, दौंड), पप्पू सुरेश तुपे (रा. शिर्सुफळ, ता. बारामती), रोहिदास युवराज सोनवणे (रा. रेल्वे क्वॅार्टर, कुरकुंभ मोरी जवळ, दौंड) , अब्राहम थॅामसन दोरखंडे, कुणाल गोपी खराटे, ओमकार अंकुश गायकवाड (तिघे रा. शालीमार चौक, दौंड) यांना या अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य व रोकड जप्त करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सुभाष राऊत, कॅान्स्टेबल अमजद शेख व अभिजित गिरमे यांनी ही कारवाई केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com