तेजस्विनी बसचे वेळापत्रक जाहीर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 मे 2019

प्रमुख मार्ग

 • कात्रज ते शिवाजीनगर  
 • अप्पर डेपो ते शिवाजीनगर
 • कात्रज ते महाराष्ट्र हौसिंग बोर्ड   
 • कात्रज ते कोथरूड डेपो 
 • हडपसर ते वारजेमाळवाडी 
 • अप्पर डेपो ते शिवाजीनगर
 • भेकराईनगर ते मनपा सात फेऱ्या
 • अ. ब. चौक ते सांगवी
 • मनपा ते लोहगाव
 • आकुर्डी रेल्वे स्टेशन ते मनपा 
 • निगडी ते भोसरी
 • निगडी ते हिंजवडी फेज-३

पुणे - पीएमपीच्या तेजस्विनी या महिला बसचे वेळापत्रक प्रशासनाने जाहीर केले आहे. त्यामध्ये पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील ३२ मार्ग निश्‍चित करून त्या मार्गावरील बसचे वेळापत्रक जाहीर केले आहे. येत्या आठ दिवसांमध्ये बस स्थानकावर हे वेळापत्रक लावण्यात येणार आहे.

पीएमपी प्रशासनाने फक्त महिलांसाठी तेजस्विनी ही बस सुरू केलेली आहे. मात्र, या बसचे वेळापत्रक जाहीर न केल्याने प्रवाशांची गैरसोय होत होती.

याबाबत वेळापत्रक जाहीर करण्याची मागणी प्रवाशांकडून वेळोवेळी केली जात होती. त्यानुसार पीएमपी प्रशासनाने वेळापत्रक जाहीर केले. त्यामुळे महिला प्रवाशांना बसची वेळ माहीत होईल अन स्थानकावरील वेळ वाचेल.याबाबत पीएमपीचे वाहतूक महाव्यवस्थापक अनंत वाघमारे म्हणाले, ‘‘तेजस्विनी बसचे वेळापत्रक दोन्ही शहरातील बस स्थानकावर आणि बस डेपोवर लावणार आहे. त्यामुळे प्रवाशांना बसची निश्‍चित वेळ माहिती होईल.’’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tejaswini Bus Time Table Declare