टेलिफोन एक्स्चेंजचा बेंगळुरूमध्ये पर्दाफाश

केरळमधील एका व्यक्तीला अटक करण्यात आली
crime
crimeSakal

पुणे - आंतरराष्ट्रीय कॉल्सचे स्थानिक कॉलमध्ये रूपांतर करणाऱ्या बेकायदेशीर टेलिफोन एक्स्चेंजचा बेंगळुरूमध्ये पर्दाफाश करण्यात आला आहे. संबंधित एक्स्चेंज चालवणाऱ्या केरळमधील एका व्यक्तीला या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाच्या लष्करी गुप्तचर विभाग आणि बेंगळुरू शहरातील मध्यवर्ती गुन्हे शाखा (सीसीबी) यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली आहे.

लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात ४१ वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली आहे. तो मूळचा केरळमधील वायनाडचा रहिवाशी आहे. शराफुद्दीन असे अटक करण्यात आलेल्या व्यक्‍तीचे नाव असून तो बेंगळुरू येथे राहतो. शराफुद्दीनवर बेकायदेशीर टेलिफोन एक्स्चेंजच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय कॉल्सचे स्थानिक कॉलमध्ये रूपांतर केल्याचा आरोप आहे.

टेलिफोन एक्स्चेंजसाठी वापरण्यात येणारे ५८ सिम बॉक्स, दूरसंचार विभागाची फसवणूक करणारे एक नेटवर्क डिटेक्टिव्ह आणि एकाच वेळी दोन हजार १४४ सिम कार्ड स्थापित करणारे इलेक्ट्रॉनिक उपकरणे या कारवार्इत ताब्यात घेण्यात आले आहेत. आरोपीवर बेकायदेशीरपणे टेलिफोन एक्स्चेंज तयार करणे, अनेक मोबाईल सिमकार्ड इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये ठेवणे, परदेशी फोन कॉल्सचे स्थानिक कॉल्समध्ये रूपांतर करणे, दूरसंचार नेटवर्कची फसवणूक करणे आणि सेवा विस्कळित करीत असल्याचे आरोप ठेवण्यात आले आहेत.

अटकेतील आरोपीने भुवनेश्वरीनगर, चिक्कसांद्रा आणि सिद्धेश्वर या चार ठिकाणी २१४४ सिमकार्ड बसवण्यासाठी ५८ इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर करून २१४४ हून अधिक मोबाईल सिमकार्ड वापरून, अनधिकृतपणे फोन कॉलचे स्थानिक कॉल इंटरनॅशनल (आयएसडी) मध्ये रूपांतरित केल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. या संदर्भात सीसीबी अधिकाऱ्यांनी बेंगळुरू शहर सायबर गुन्हे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून त्यांचा तपास सुरू आहे. आणखी किती जण नेटवर्क वापरत आहेत याचा तपास सुरू आहे. या टीमचे नेतृत्व सीसीबी युनिटचे अधिकारी आणि दक्षिण मुख्यालयाच्या लष्करी गुप्तचर विभागाने केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com