दुर्बिणीतून गर्भाशय प्रत्यारोपण

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 जुलै 2018

पुणे - दुर्बिणीतून गर्भाशय प्रत्यारोपणाचे धडे पुण्याने जगाला रविवारी दिले. देशातील सहावी गर्भाशय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पुण्यातील गॅलॅक्‍सी केअर हॉस्पिटलमध्ये झाली. ही शस्त्रक्रिया अभ्यासण्यासाठी तीन देशांतील डॉक्‍टर पुण्यात आले होतेच; पण इटलीतील पाचशेहून शल्यचिकित्सकांनी थेट प्रक्षेपणातून ही शस्त्रक्रिया पाहिली. 

देशातील पहिली गर्भाशय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पुण्यातच झाली होती. त्यानंतर या प्रकारच्या पाच यशस्वी शस्त्रक्रिया झाल्या आहेत. त्यापैकी प्रत्यारोपित केलेल्या एका गर्भाशयात तीन महिन्यांचा गर्भ वाढत आहे. या पार्श्‍वभूमीवर पुण्यात रविवारी सहावी गर्भाशय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाली. आईने दान केलेले गर्भाशय दुर्बिणीद्वारे काढून मुलीमध्ये प्रत्यारोपित करण्यात आले. 

जगभरामध्ये गर्भाशय काढण्यासाठी मोठा छेद घेऊन शस्त्रक्रिया केली जाते. त्या ऐवजी ही शस्त्रक्रिया दुर्बिणीतून करण्याचा जगातील पहिला प्रयोग पुण्यात झाला. त्यामुळे ही शस्त्रक्रिया अभ्यासण्यासाठी अमेरिका, रशिया आणि इस्त्राईल येथील वैद्यकीय तज्ज्ञांचे पथक पुण्यात आले होते. तसेच, या शस्त्रक्रियेचे थेट प्रक्षेपण पुण्यातून इटलीमध्ये करण्यात आले. 

याबाबत गॅलॅक्‍सी केअर हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. शैलेश पुणतांबेकर म्हणाले, ‘‘आईने मुलीला दिलेली गर्भाशय प्रत्यारोपणाची सलग सहावी शस्त्रक्रिया पुण्यात यशस्वी झाली. दान केलेले गर्भाशय शस्त्रक्रिया काढण्यापासून ते प्रत्यारोपित करण्यापर्यंतची सर्व प्रक्रिया सहा तासांमध्ये पूर्ण करण्यात आली. या दोन्ही शस्त्रक्रियांसाठी चौदा तास लागत होते. हे तंत्र पुण्याने जगाला दिले आहे. ते अभ्यासण्यासाठी वेगवेगळ्या देशांतील डॉक्‍टर पुण्यात येत आहेत.’’ डॉ. नीता वर्टी, डॉ. संदेश कादे, डॉ. मिलिंद तेलंग, डॉ. शार्दूल दाते, डॉ. निखिल आगरखेडकर, डॉ. भूषण किनोलकर, डॉ. पंकज कुलकर्णी, डॉ. मनोज मंचेकर, डॉ. मिहीर चितळे यांनी ही शस्त्रक्रिया केली. 

Web Title: Telescope uterus transplant