टेमघरची धरणाची गळती ९० टक्के रोखली

टेमघरची धरणाची गळती ९० टक्के रोखली

खडकवासला : टेमघर धरणात २०१६ मध्ये आज उपलब्ध असलेल्या पाणीसाठा असताना धरणातून प्रति सेकंद 2147.73 लीटर एवढी गळती होत होती. पहिल्यावर्षीचे दुरुस्तीच्या काम पूर्ण झाल्यानंतर सध्या प्रतिसेकंद 208 लिटर म्हणजे सुमारे 90 टक्के पर्यंत गळती कमी झाल्याचा दावा जलसंपदा विभागाच्या वतीने करण्यात आला आहे. परिणामी टेमघर धरण फुटण्याचा धोका कमी झाल्याने पुणेकरांवरील संकट टळले. असे पुणे पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता प्रवीण कोल्हे यांनी सांगितले.

टेमघर धरणातून 2016 मध्ये होणारी गळती ही धरणाला धोका निर्माण करणारी होती. या गळतीचे गांभीर्य घेऊन जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी तातडीने पावले उचलून युद्ध पातळीवर दुरुस्तीचे काम 2017मध्ये हाती घेतले. तीन टप्प्यात केली जाणार आहे. यामध्ये सिमेंट मिश्रणाचे ग्राऊंटिंग, पाण्याच्या आतील बाजूच्या भिंतीस शॉटक्रीट(नवीन यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून गिलावा करणे) केले जाणार आहे.  तिसऱ्या टप्प्यात गळतीचे पाणी भिंतीच्या बाहेरील बाजूने पाणी पडते. त्या ठिकाणी पाणी जाण्यासाठी ड्रेनेज व्यवस्था  दुरुस्ती करावी लागणार आहे. 
दुरुस्तीच्या कामात केंद्रीय जल व विद्युत संशोधन संस्थेच्या  मार्गदर्शनानुसार दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. धरणातील पोकळ्या भरून काढण्यासाठी सिमेंट,  फ्लाय ऍश, सिलिका, सुपर प्लास्टीझर, तसेच हे सर्व विविध टाकण्यात येणारे पदार्थ एकत्र करून त्याची मजबुती वाढविण्यास मदत करणारे घटक यामध्ये टाकली जाणार आहे. त्यांचे मिश्रण एकत्र करण्याच्या प्रकारात देखील यांत्रिकीकरण वापरले जाणारे आहे. असे कोल्हे यांनी टेमघर येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी, कार्यकारी अभियंता सुनील प्रदक्षिणे, उपअभियंता राजेंद्र कुंजीर उपस्थित होते.

टेमघर धरणाचे काम 2010 मध्ये पूर्ण झाल्यानंतर या धरणातून गळती होत असल्याचे निदर्शनास आले. याबाबत, गळती रोखणे व दुरुस्तीच्या उपाययोजना करणयासाठी राज्य सरकार ने  निवृत्त सचिव रानडे यांची नियुक्ती केली होती. त्याच्या अहवालानुसार काम सुरू केले आहे. 

यासाठी सुमारे दीड दोन वर्ष दुरुस्तीचे काम सुरू राहणार आहे. यामध्ये, पहिल्या टप्प्यातील गळतीचे काम पूर्ण झाल्यानंतर गळतीचे काम 90 टक्के पूर्ण झाले आहे.  या दरम्यान, येत्या दीड वर्षात लांब टप्प्यातील दुरूस्तीचा आराखडा केला जाईल. त्यानंतर, तो राबविण्यात येईल. असे ही कोल्हे यांनी सांगितले. 

यंदा, टेमघर धरणात 75 टक्क्यांपर्यंत पाणी साठविणार आहे. सध्या या धरणात आज गुरुवारी 68 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर पर्यंत पाणी साठवून पाणी मुठा नदीत सोडले जाणार आहे. ते पाणी खडकवासला धरणात जमा होते. त्यानंतर लगेच दुरुस्ती करण्यासाठी जास्त वेळ मिळणार आहे. परिणामी काम अचूक व जास्तीत जास्त लवकर काम पूर्ण होईल. असे कार्यकारी अभियंता सुनील प्रदक्षिणे यांनि सांगितले. 

नोव्हेंबरनंतर धरणाच्या आतील बाजूला शॉर्टक्रीट चे काम सुरू होईल. दरम्यान, देशातील विविध धरणाची गळती होत असलेल्या धरणाची दुरुस्ती काम करताना टेमघर धरणाचा संदर्भ घेतला जाणार आहे. परिणामी धरण दुरुस्तीचा टेमघर पॅटर्न तयार होत आहे. 

ठेकेदारांकडून १०० कोटी वसूल करणार 
टेमघर धरणाचे बांधकाम पूर्ण करणा-या ठेकेदाराने हे काम खूपच निकृष्ट दर्जाचे केले आहे. त्याच्या चुकीमुळे केवळ दुरुस्तीसाठी सुमारे १०० कोटी रुपये खर्च येणार आहे. हा खर्च संबंधित ठेकेदाराकडून वसूल केला जाणार आहे. त्याची सुमारे पाच कोटी रुपयांची अनामत रक्कम जप्त करण्यात आली आहे. उर्वरित वसुलीसाठी महसूल प्रशासनाच्या मदतीने त्याच्या मालमत्ता जप्तीसाठी प्रयत्न केले जाणार आहेत. या धरणाच्या बांधकामाची किंमत २५३ कोटी आहे, असे अधीक्षक अभियंता प्रवीण कोल्हे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com