टेमघर धरणात पाणी साठण्यास सुरवात

राजेंद्रकृष्ण कापसे
शनिवार, 30 जून 2018

टेमघर धरणाची दुरूस्ती करण्यासाठी धरण मागील वर्षी जानेवारी 2017 मध्ये पूर्ण रिकामे करण्यात आले होते. यंदाच्या पावसाळी वर्षात या धरणात आज 0.10 टीएमसी उपयुक्त पाणीसाठा जमा होण्यास सुरवात झाली आहे. 

खडकवासला : टेमघर धरणाची दुरूस्ती करण्यासाठी धरण मागील वर्षी जानेवारी 2017 मध्ये पूर्ण रिकामे करण्यात आले होते. यंदाच्या पावसाळी वर्षात या धरणात आज 0.10 टीएमसी उपयुक्त पाणीसाठा जमा होण्यास सुरवात झाली आहे. 

टेमघर धरण हे मुठा नदीवर बांधले असून ते मुळशी तालुक्यात आहे. या धरणातून खडकवासला धरणात पाणी सोडले जाते. टेमघर धरणाची उपयुक्त पाणी साठवण क्षमता ही 3.70 टीएमसी आहे. आज धरणात 0.100 टीएमसी पाणी जमा झाले. म्हणजे शनिवारी सकाळपर्यंत धरणात 2.60 टक्के पाणी साठा आहे. टेमघर परिसरात एक जून पासून 483 मिलिमीटर पाऊस पडला आहे. शुक्रवारी सकाळी या धरणात 0.050, संध्याकाळी 0.07तर शनिवारी सकाळी 0.10 टीएमसी पाणी जमा झाले आहे.

खडकवासला धरणात एकूण 0.50टीएमसी म्हणजे 25.50 टक्के पाणीसाठा जमा आहे. पानशेत धरणात 2.75 टीएमसी म्हणजे 25.85 टक्के पाणी साठले आहे. वरसगाव धरणाच्या गळतीचे काम सुरू असल्याने  हे धरण देखील मागील वर्षी रिकामे करण्यात आले. त्यात अद्याप उपयुक्त पाणी साठा जमा झालेला नाही.  चार ही धरणात मिळून 3.35 टीएमसी म्हणजे 11.50 टक्के पाणीसाठा आहे.

आजचा पाऊस
 शुक्रवार सकाळी सहा ते शनिवार सकाळी सहा वाजेपर्यंत धरण परिसरात पाऊस पडला पण त्याला जोर नव्हता. खडकवासला धरणात 1 मिलिमीटर पाऊस पडला. पानशेत येथे 10, वरसगाव 9 आणि टेमघर येथे 39 मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

Web Title: Temghar dam water capacity