टेमघर धरणाची दुरुस्ती जूनपर्यंत करणार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 फेब्रुवारी 2020

उच्चस्तरीय समितीकडून समाधान
राज्य सरकारने या प्रकल्पासाठी तज्ज्ञांची उच्चस्तरीय समिती (पॅनेल ऑफ एक्‍स्पर्ट) नेमली आहे. या समितीची बैठक जानेवारी अखेरीस पार पडली. या समितीमधील तज्ज्ञांनी गळती प्रतिबंधक कामाबाबत समाधान व्यक्‍त केले, असे कोल्हे यांनी सांगितले.

खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठा (चार धरणांतील)
४ फेब्रुवारी २०२० अखेर      :      २१.६४ टीएमसी (७४.२१ टक्‍के)
गतवर्षी याच तारखेपर्यंत      :      १४.२२ टीएमसी (४८.७९ टक्‍के)
टेमघर धरण आजअखेर      :     ०.०८ टीएमसी (२.१७ टक्‍के)

पुणे - टेमघर धरणातून होणारी पाणीगळती रोखण्यासाठी धरण जवळपास पूर्ण रिकामे करण्यात आले आहे. धरणाची गळती प्रतिबंधक कामे ३५ टक्‍के झाली असून, येत्या जूनपर्यंत बहुतांश कामे पूर्ण करण्यात येतील, अशी माहिती पुणे पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे अधीक्षक अभियंता प्रवीण कोल्हे यांनी दिली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

खडकवासला प्रकल्पातील टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चार धरणांतून पुणे शहराला पिण्यासाठी पाणीपुरवठा केला जातो. तसेच, तीन तालुक्‍यांमधील काही गावांमध्ये सिंचनासाठी पाणीपुरवठा करण्यात येतो. 

पुण्यात चालत्या एसटीने घेतला पेट, बस जळून खाक; एकदा व्हिडिओ पाहाच

यंदा चांगला पाऊस झाल्यामुळे ही चारही धरणे पूर्ण भरली होती. या पावसाळ्यात टेमघर दोनदा भरून वाहिले. या भागात मुसळधार पावसामुळे गळती प्रतिबंधक कामे करता आली नाहीत; परंतु त्यानंतर दुरुस्तीसाठी टेमघर धरणातून खडकवासला धरणात पाणी सोडण्यात आले. येत्या जूनपर्यंत पाणीगळती रोखण्यासाठी उपाययोजना पूर्णत्वास आणल्या जातील. त्यानंतर दीर्घकालीन उपाययोजना करण्यात येणार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Temghar Dam will be repaired by June