राज्यात राजकारण, तर पुण्यात वातावरण तापले

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 नोव्हेंबर 2019

राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन १७ दिवस झाल्यानंतर सत्तास्थापनेच्या हालचालींना गेल्या २४ तासांपासून वेग आला आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापत असतानाच पुण्यात मात्र कमाल तापमानाचा पारा वाढत असल्याचे दिसून येत आहे.

पुणे - थंडीला सुरवात होणाऱ्या नोव्हेंबरच्या सुरवातीलाच राज्यातील राजकारण तापत असताना शहरातील वातावरण तापल्याचे जाणवत आहे. शहरात चार दिवसांपासून कमाल तापमानात सातत्याने वाढ होत असल्याचे निरीक्षण हवामान खात्याने नोंदविले आहे.

राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन १७ दिवस झाल्यानंतर सत्तास्थापनेच्या हालचालींना गेल्या २४ तासांपासून वेग आला आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापत असतानाच पुण्यात मात्र कमाल तापमानाचा पारा वाढत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या आठवड्यात कमाल तापमानाचा पारा अंशतः कमी झालेला होता. पहाटे गारठा जाणवत होता. त्याच वेळी आकाश अंशतः ढगाळ असल्याने कमाल तापमानाचा पारा सरासरीपेक्षा कमी नोंदला जात होता. मात्र, चार दिवसांपासून वातावरणात बदल होत आहे. आकाश निरभ्र असल्याने कमाल तापमान वाढत आहे. 

पुण्यात ७ नोव्हेंबर रोजी २९.७ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले. हे कमाल तापमान रविवारपर्यंत ३१.६ अंश सेल्सिअसपर्यंत वाढले. त्यामुळे चार दिवसांमध्ये १.९ अंश सेल्सिअसने तापमान वाढल्याचे निरीक्षण हवामान खात्याने नोंदविले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: temperature increase in pune