पुणेकरांना भरली हुडहुडी; तापमान 17 अंश सेल्सिअसवर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 नोव्हेंबर 2019

शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसांत सरासरीच्या तुलनेत अधिक पाऊस झाला. परंतू, आता अरबी समुद्रातील 'महा' चक्रीवादळाचा जोर ओसल्यामुळे सध्या पावसाने विश्रांती घेतली आहे. येत्या 15 नोव्हेंबरपर्यंत आकाश पूर्ण निरभ्र राहील. यंदा थंडीला नोव्हेंबर महिन्याचा दुसरा आठवडा उजाडला. पाऊस थांबल्यामुळे बागांमध्ये आणि टेकड्यांच्या परिसरात पहाटेच्या सुमारास फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून आले.

पुणे : शहराच्या तापमानात शनिवारी दोन अंश सेल्सिअसने घट होऊन तो 17 अंश सेल्सिअसवर पोहचले आहे. आज पहाटे थंडीमुळे हुडहुडी भरली होती. तर, दिवसभरात कमाल तापमान 30.2 अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. रविवारीही (ता. 10) साधारण असेच हवामान राहील, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने व्यक्‍त केला आहे.

शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसांत सरासरीच्या तुलनेत अधिक पाऊस झाला. परंतू, आता अरबी समुद्रातील 'महा' चक्रीवादळाचा जोर ओसल्यामुळे सध्या पावसाने विश्रांती घेतली आहे. येत्या 15 नोव्हेंबरपर्यंत आकाश पूर्ण निरभ्र राहील. यंदा थंडीला नोव्हेंबर महिन्याचा दुसरा आठवडा उजाडला. पाऊस थांबल्यामुळे बागांमध्ये आणि टेकड्यांच्या परिसरात पहाटेच्या सुमारास फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून आले.

गेल्या दोन दिवसांत शहरात कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस होते. तर, गुरुवारी किमान तापमान 19.3 अंश सेल्सिअस होते. त्यात घट होऊन शुक्रवारी 18.4 तर शनिवारी आणखी पारा घसरून तो 17 अंश सेल्सिअसपर्यंत पोचला. पुढील आठवड्यात सोमवारपासून कमाल तापमानात किंचित वाढ होऊन तो 32 अंश सेल्सिअसवर जाईल. तर, किमान तापमान 18 अंश सेल्सिअस राहील, अशी माहिती हवामानशास्त्र विभागाकडून देण्यात आली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Temperature in Pune was 17 degrees Celsius