पुणे शहरात उन्हाचा चटका

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 फेब्रुवारी 2019

पुणे - माघ पौर्णिमेनंतर शहरात उन्हाचा चटका आणि उकाडा वाढला असल्याचे पुणेकरांनी गुरुवारी अनुभवले. किमान तापमानाचा पारा ३६.४ अंश सेल्सिअसवर गेला. ढगाळ वातावरणामुळे घरातील, कार्यालयांमधील पंखे आणि वातानुकूलित यंत्रणा दिवसभर पुणेकरांनी सुरू ठेवल्याचे दिसून आले. 

पुणे - माघ पौर्णिमेनंतर शहरात उन्हाचा चटका आणि उकाडा वाढला असल्याचे पुणेकरांनी गुरुवारी अनुभवले. किमान तापमानाचा पारा ३६.४ अंश सेल्सिअसवर गेला. ढगाळ वातावरणामुळे घरातील, कार्यालयांमधील पंखे आणि वातानुकूलित यंत्रणा दिवसभर पुणेकरांनी सुरू ठेवल्याचे दिसून आले. 

शहरात दोन दिवसांपासून सकाळी उन्हाचा चटका आणि रात्री गारठा, असे वातावरण होते. बुधवारी रात्रीपासून वातावरणात बदल झाल्याचे निरीक्षण हवामान खात्याकडून नोंदविले आहे. बुधवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत १४.२ अंश सेल्सिअस नोंदल्या गेलेल्या किमान तापमानाचा पारा गुरुवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत ३.३ अंश सेल्सिअसने वाढून १७.५ अंश सेल्सिअस झाला. बुधवारी दिवसभर उन्हाचा चटका होता. मात्र, गुरुवारी दुपारनंतर ढगाळ वातावरण होते. त्याचा थेट परिणाम कमाल तापमानावर झाला. बुधवारी ३७.५ अंश सेल्सिअस नोंदलेल्या कमाल तापमानाचा पारा ३६.४ अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरला. त्यामुळे दुपारपर्यंत उन्हाचा चटका आणि ढगाळ वातावरणामुळे उकाडा, असा दिवस पुणेकरांनी अनुभवला. 

पुढील दोन दिवसांमध्ये आकाश निरभ्र राहणार आहे. त्यामुळे उन्हाचा चटका आणखी वाढेल, असा अंदाजही हवामान खात्याने वर्तविला आहे. येत्या शुक्रवारी (ता. २२) कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअसच्या दरम्यान नोंदले जाईल, असेही खात्यातर्फे सांगण्यात आले. 

भोर, मुळशीत सरी
विदर्भातील काही भागात दोन दिवसांपासून पाऊस पडत आहे, तर काही ठिकाणी गारपीट झाली आहे. गुरुवारी पुणे जिल्ह्याच्या भोर, मुळशी भागात काही ठिकाणी पावसाच्या सरींनी हजेरी लावली. राज्यात सर्वाधिक तापमान मालेगाव येथे ३८.६ अंश सेल्सिअस नोंदले गेले.

सकाळ'ला सोशल मीडियावर लाईक करा :
'सकाळ' फेसबुक : @SakalNews
'सकाळ' ट्विटर : @eSakalUpdate
इन्स्टाग्राम : @esakalphoto

Web Title: Temperature recorded in the city of Pune 36.4