मंदिरे बंदच राहणार; मात्र देवीचे ऑनलाइन दर्शन घडविण्याची व्यवस्था

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 18 October 2020

पुणे शहरातील देवीची मंदिरे आणि घराघरांत शारदीय नवरात्र महोत्सवास आज चैतन्यमयी वातावरणात सुरुवात झाली. बहुतांश मंदिरांनी सुरक्षिततेची सर्व खबरदारी घेत घटस्थापना केली. कोरोनाचा प्रसार होत असल्याने सर्व मंदिरे बंद ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे मंदिर प्रशासनाने संकेतस्थळ, यू ट्यूबच्या माध्यमातून देवीचे दर्शन भाविकांना घडविण्याची तयारी केली आहे.

पुणे - पुणे शहरातील देवीची मंदिरे आणि घराघरांत शारदीय नवरात्र महोत्सवास आज चैतन्यमयी वातावरणात सुरुवात झाली. बहुतांश मंदिरांनी सुरक्षिततेची सर्व खबरदारी घेत घटस्थापना केली. कोरोनाचा प्रसार होत असल्याने सर्व मंदिरे बंद ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे मंदिर प्रशासनाने संकेतस्थळ, यू ट्यूबच्या माध्यमातून देवीचे दर्शन भाविकांना घडविण्याची तयारी केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

चतुःशृंगी देवीच्या मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त आज सकाळी नऊ वाजता देवीचा अभिषेक, षोडशोपचार महापूजा व महावस्त्र अर्पण करून पारंपरिक पद्धतीने घटस्थापना करण्यात आली. विश्‍वस्त नरेंद्र अनगळ यांच्या हस्ते सर्व धार्मिक विधी झाले. नारायणशास्त्री कानडे गुरुजी आणि श्रीरामशास्त्री कानडे गुरुजी यांनी पौरोहित्य केले. अध्यक्ष किरण अनगळ आणि देवेंद्र अनगळ उपस्थित होते. भाविकांना दर्शनासाठी मंदिराच्या आवारात प्रवेश दिला जाणार नाही. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर थेट दर्शनासाठी एलईडी स्क्रीन लावण्यात आली आहे. 

चोरट्यांची 'छप्पर फाड के' चोरी; सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर मारला डल्ला

महाभिषेक आणि महाआरती
शिवदर्शन येथील श्री लक्ष्मीमाता मंदिरात घटस्थापना करण्यात आली. लक्ष्मीमातेचा शृंगार करण्यात आला. महाभिषेक आणि महाआरती करण्यात आली. दंडवते गुरुजी आणि शर्मा गुरुजी यांनी पौरोहित्य केले.  सांस्कृतिक कार्यक्रम आणि महिला महोत्सव यंदा रद्द करण्यात आला आहे. पुणे महापालिकेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते आबा बागुल आणि जयश्री बागुल यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. 

मास्क न घातल्यामुळे कारवाई करणाऱ्या पोलिसाच्या पायावर पठ्ठ्यानं घातली दुचाकी

कोरोनायोद्ध्यांच्या हस्ते पूजन
श्री महालक्ष्मी मंदिर सारसबाग, श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्टच्यावतीने आयोजित शारदीय नवरात्र महोत्सवाचा प्रारंभ शनिवारी सकाळी नऊ वाजता घटस्थापनेने झाला. कोरोनायोद्धे असलेल्या स्त्री रोगतज्ज्ञ डॉ. क्षमा उपलेंचवार आणि नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. नीलेश उपलेंचवार यांच्या हस्ते पूजन झाले. भक्तांच्या आरोग्याच्या दृष्टीने सर्वांचे हित लक्षात घेता यंदाचा उत्सव साधेपणाने करण्यात येत आहे. त्यामुळे भाविकांनी दर्शनासाठी गर्दी करण्याचा प्रयत्न करू नये. ट्रस्टच्या संकेतस्थळद्वारे देवीच्या दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे, असे विश्‍वस्त भरत अगरवाल यांनी सांगितले.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Temple close in navratrotsav by coronavirus online darshan planning