पुणे : 18 दुचाकींसह टेम्पो चोरीला; चौघे अटकेत

पुणे : 18 दुचाकींसह टेम्पो चोरीला; चौघे अटकेत

कुरुळी : वाहनचोरी विरोधी पथक, गुन्हे शाखा युनिट तीनच्या पथकाने दहा लाख तीस हजार रुपये किमतीच्या एकूण अठरा चोरीच्या दुचाकी व एक टेम्पो हस्तगत केला आहे. या प्रकरणी चौघांना ताब्यात घेतले असून, वाहनचोरीचे तब्बल गुन्हे व एटीएम चोरीचे दोन प्रकार उघडकीस आले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी चौघांना गजाआड केले आहे.

प्रवीण गोरक्षनाथ गाडे (वय 26, सध्या रा. वाकी ता. खेड, मूळ रा. सावरगावतळे, ता. संगमनेर, जि. नगर) नितीन मच्छिंद्र नेहे (वय 23) निखिल बाळासाहेब गाडे (दोघेही रा. सावरगावतळे, ता. संगमनेर, जि. नगर) व हरीश लक्ष्मण गाडे (वय 25 सध्या रा. आळंदी, मूळ रा. नगर) असे या प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या चौघांचे नाव आहे. 

हिंजवडी, निगडी, चिखली, तळेगाव दाभाडे, संगमनेर, मंचर, आळेफाटा, सिन्नर, कोतवाली पोलिस स्टेशन, नगर, तसेच चाकण व खेड पोलिस स्टेशन आदी ठिकाणी वरील चौघांवर वाहन चोरीसह अन्य गुन्हे दाखल आहेत. त्यांच्याकडून खालुंब्रे (ता. खेड) येथील एटीएम मशिन फोडून त्यातील पैसे 
चोरण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हाही उघडकीस आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

पोलिसांनी सदरची सर्व वाहने ताब्यात घेतले आहेत. ही कारवाई पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाचे पोलिस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक भानुदास जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com