दहाच्या नाण्याचा प्रश्न बनला गंभीर

मिलिंद संगई
मंगळवार, 26 जून 2018

बारामती शहर - दहा रुपयांच्या सुट्या नाण्यांचा प्रश्न बारामती पंचक्रोशीत कमालीचा गंभीर बनला आहे. चलनात अनेक ठिकाणी ही नाणी नाकारली जात असल्याने व बँकाही दररोज एक हजार रुपयांपेक्षा अधिक नाणी स्विकारत नसल्याने गोंधळाचे वातावरण आहे.चलनात असलेल्या एक, दोन व पाच रुपयांच्या नाण्यांबाबत फारशी अडचण कोठेच येत नाही, मात्र आजही अनेक दुकानदारांपासून व्यापारीही दहा रुपयांची नाणी स्विकारत नसल्याच्या तक्रारी आहेत. 

बँकामधून जर या नाण्यांचा भरणा करण्यासाठी गेले तर एका दिवशी एका व्यक्तीला एक हजार रुपयांहून अधिक रकमेचा नाण्यांच्या स्वरुपातील भरणा कोणतीच बँक स्विकारत नाही.या बाबत बँकांच्या व्यवस्थापकांशी संपर्क साधला असता रिझर्व्ह बँकेनेच हा नियम केल्याचे सांगितले. दुसरीकडे बारामतीतील अनेक प्रमुख बँकांकडे कोट्यवधी रुपयांची दहाची नाणी पडून आहेत, ग्राहकही ती स्विकारत नाहीत आणि रिझर्व्ह बँकेकडूनही ती बाजारात फिरवण्यास सांगितले जाते. 

शहरातील प्रमुख 22 बँकाकडे अक्षरशः काही कोटी रुपयांमध्ये दहाची नाणी लोखंडी ट्रंकमध्ये पडून आहेत, अशीही माहिती मिळाली. 

स्थानिक व्यवस्थापकांना माध्यमांशी संवाद साधण्याची परवानगी नसल्याने कोणीही बोलण्यास तयार होत नव्हते मात्र यात शासनस्तरावरच काहीतरी मार्ग काढला जाणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. या मध्ये बँकांनी जबरदस्तीने ग्राहकांना दहाची नाणी दिली तरी ग्राहक लगेच दुस-या दिवशी भरणा करण्यासाठी तीच नाणी आणतात, आणि बँकांना ती स्विकारावीच लागतात, हा खेळ अनेक महिन्यांपासून सुरु आहे. 

चलनात ही नाणी यावीत असा रिझर्व्ह बँकेचा प्रयत्न असला तरी आज कोट्यवधींची नाणी बँकात पडून असतील तर हा प्रश्न गंभीर असून त्यावर शासन स्तरावर काही उपाययोजना करण्याची गरज बोलून दाखविली जात आहे.

Web Title: ten coin not accepted by anyone