दहा तासांत पीएमपीच्या तिजोरीमध्ये 84 लाख! 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 ऑगस्ट 2018

पुणे : रक्षाबंधन सणाच्या दिवशी अवघ्या दहा तासांत पीएमपीला 84 लाख 56 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. पीएमपीने प्रवाशांसाठी जादा 88 बस उपलब्ध करून दिल्या. त्यामुळे प्रवाशांची सोय झाली. 

रक्षाबंधनाच्या दिवशी पीएमपीचे उत्पन्न सर्वाधिक असते, असा गेल्या काही वर्षांचा अनुभव आहे. रविवारी दिवसभर शहराच्या वेगवेगळ्या भागांत पाऊस झाला. त्यामुळे नेहमीच्या तुलनेत प्रवाशांची संख्या कमी होती. मात्र, सकाळच्या सत्रात पीएमपीला 84 लाख 56 हजार 615 उत्पन्न मिळाले. 

या सणानिमित्त पीएमपी प्रशासनाकडून पहाटे 5 ते दुपारी 3 वाजेपर्यंत 1 हजार 663 बस विविध मार्गांवर सोडण्यात आल्या होत्या. त्यामध्ये पीएमपीच्या 1 हजार 160, तर खासगी भाडेत्त्वावरील 503 बसचा समावेश होता. दुपारी 3 वाजेपर्यंत पीएमपीला 84 लाख 56 हजार 615 रुपयांचे उत्पन्न मिळाले. यामध्ये 81 लाख 63 हजार 975 रुपये, तर पासच्या माध्यमातून 2 लाख 92 हजार 640 रुपयांचे उत्पन्न मिळाले. गेल्या वर्षी रक्षाबंधनाच्या दिवसी पीएमपीला 1 कोटी 97 लाख 19 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. 
 
Web Title: In ten hours PMP secured 84 lakhs!