भाजप नेत्याच्या कारमध्ये दहा लाखांच्या जुन्या नोटा

वृत्तसंस्था
शनिवार, 10 डिसेंबर 2016

बारामती नगपरिषदेची निवडणूक प्रक्रिया सध्या सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आजच संध्याकाळी सव्वा पाच वाजता बारामतीमध्ये प्रचार सभा आहे. त्यापार्श्वभूमीवर भाजपच्या माजी नगरसेवकाच्या कारमध्ये नोटा सापडल्याने तर्कवितर्क करण्यात येत आहेत.

पुणेः भाजपचे माजी नगरसेवक उज्ज्वल केसकर आणि युवक आघाडीचे पदाधिकारी दीपक पोटे यांच्या कारमधून पोलिसांनी दहा लाख रूपयांच्या जुन्या नोटा जप्त केल्या आहेत. 

सासवडमध्ये शुक्रवारी रात्री ही कारवाई करण्यात आली. आपण हे पैसे बारामतीमधील बँकेत भरण्यासाठी घेऊन जात होतो, असा दावा त्यांनी केल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. पोलिसांनी या घटनेची माहिती प्राप्तिकर खात्याला कळविली आहे. 

बारामती नगपरिषदेची निवडणूक प्रक्रिया सध्या सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आजच संध्याकाळी सव्वा पाच वाजता बारामतीमध्ये प्रचार सभा आहे. त्यापार्श्वभूमीवर भाजपच्या माजी नगरसेवकाच्या कारमध्ये नोटा सापडल्याने तर्कवितर्क करण्यात येत आहेत.

Web Title: Ten lacs cash in old currency found in BJP leader car