पोलिसांकडे थकले महापालिकेचे दहा लाख 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 ऑगस्ट 2018

पिंपरी - महापालिकेने पोलिस प्रशासनाला भाडेतत्त्वावर दिलेल्या शहराच्या विविध भागांतील मिळकतींचे २०१७-२०१८ या वर्षातील दहा लाख २५ हजार ९९३ रुपये भाडे थकले असल्याचे माहिती कायद्यात समोर आली आहे. 

पिंपरी - महापालिकेने पोलिस प्रशासनाला भाडेतत्त्वावर दिलेल्या शहराच्या विविध भागांतील मिळकतींचे २०१७-२०१८ या वर्षातील दहा लाख २५ हजार ९९३ रुपये भाडे थकले असल्याचे माहिती कायद्यात समोर आली आहे. 

पोलिस खात्याला दिलेल्या मिळकतीच्या थकबाकी व वसुलीचे कामकाज संबंधित क्षेत्रीय कार्यालयांमार्फत चालते. मोहननगर येथील संघवी महाविद्यालयाशेजारील बहुउद्देशीय हॉल (आरक्षण क्रमांक ४४) पोलिस उपायुक्त गुन्हे शाखा, प्रीमियर प्लाझा (आरक्षण क्रमांक १८०) येथील इमारत पोलिस उपायुक्त परिमंडळ तीन कार्यालयासाठी, मेघाजी लोखंडे सभागृहातील गाळा क्रमांक दोन व तीन पिंपरी वाहतूक विभागासाठी, पिंपळे गुरव येथील उद्यानात असलेल्या सुरक्षारक्षकाचे निवास हे सांगवी पोलिस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या पिंपळे गुरव पोलिस चौकीला, तर थेरगाव-सर्व्हे नंबर नऊमधील मिळकत वाकड पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या थेरगाव चौकीला भाड्याने दिलेली आहे. मात्र, मागील वर्षाचे भाडे अद्याप महापालिकेला मिळालेले नाही.  

‘‘झोपडपट्टी पुनर्वसन कार्यालयातील वाहनतळाचा वापर चिंचवड पोलिस ठाण्यातील बेवारस वाहनांसाठी केला जात आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना वाहने लावण्यास जागा राहत नाही. यासंदर्भात पोलिस प्रशासनाकडून भाडे वसूल करण्याच्या कार्यवाहीबाबत महापालिका आयुक्तांना निवेदन दिले आहे,’’ असे सामाजिक कार्यकर्ते वसंत रेंगडे यांनी सांगितले.

Web Title: Ten lakhs of municipal fare tired of the police