esakal | बारामतीत आज दहा रुग्ण पॉझिटीव्ह; नऊ महिन्यांच्या मुलीलाही संसर्ग
sakal

बोलून बातमी शोधा

Ten patients tested positive in Baramati today

बारामतीतील रुग्णांमध्ये नऊ महिन्यांच्या बालिकेपासून तब्बल 80 वर्षांच्या वयोवृध्द नागरिकापर्यंत प्रत्येक वयोगटातील लोकांना कोरोनाची बाधा झाल्याचे आकडेवारीवरुन स्पष्ट होत असल्याने प्रत्येक वयोगटातील घटकांनी कमालीची काळजी घेण्याची गरज वैद्यकीय व्यावसायिकांनी बोलून दाखविली आहे. 

बारामतीत आज दहा रुग्ण पॉझिटीव्ह; नऊ महिन्यांच्या मुलीलाही संसर्ग

sakal_logo
By
मिलिंद संगई

बारामती : शहरातील कोरोनाग्रस्तांची संख्या नियमितपणे वाढू लागली आहे. काल घेतलेल्या 81 नमुन्यांपैकी दहा रुग्ण पॉझिटीव्ह आले असून अजून पाच जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत. यापैकी 65 जण निगेटीव्ह आले आहेत. बारामतीतील रुग्णांची संख्या आता 232 वर जाऊन पोहोचली आहे. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी या बाबत माहिती दिली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

यामध्ये शहरातील एका नऊ महिन्यांच्या छोट्या मुलीसही कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्याने चिंता वाढली आहे. लहान मुलांपर्यंतही हा संसर्ग पोहोचू लागल्याने पालकांनी अधिकची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आज आढऴून आलेल्या रुग्णांमध्ये प्रगतीनगर, जगताप मळा, जळोची, आमराई तसेच निंबूत येथील कंपनीतील कामगार पॉझिटीव्ह आला आहे. दरम्यान शहरातील राम गल्लीमधील कोरोनाग्रस्ताच्या संपर्कातील तीन कुटुंबियही पॉझिटीव्ह आढळले आहेत. 

राज्यात नवीन महाविद्यालयांना मान्यता; पदवी अभ्यासक्रमाच्या जागा वाढणार

बारामतीतील रुग्णांमध्ये नऊ महिन्यांच्या बालिकेपासून तब्बल 80 वर्षांच्या वयोवृध्द नागरिकापर्यंत प्रत्येक वयोगटातील लोकांना कोरोनाची बाधा झाल्याचे आकडेवारीवरुन स्पष्ट होत असल्याने प्रत्येक वयोगटातील घटकांनी कमालीची काळजी घेण्याची गरज वैद्यकीय व्यावसायिकांनी बोलून दाखविली आहे. 

बारामतीतील 97 रुग्ण बरे होऊन घरी गेले असून 16 जणांचा मृत्यू झाला आहे. बारामतीत रुई येथे रॅपिड अँटीजन टेस्ट सुरु झाल्यामुळे प्रयोगशाळेवरील ताण थोडा कमी होण्यास मदत झाली आहे. 


रायगड जिल्हा परिषदेत कोरोनाचा धुडगूस; अँटिजेन तपासणीत इतक्या जणांना लागण झाल्याचे उघड 

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज बारामती दौऱ्यावर असून दुपारी ते आढावा बैठक घेणार आहेत. बारामती शहर व तालुक्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या शून्यावर आणण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असून त्या बाबतची माहिती उपमुख्यमंत्र्यांना दिली जाणार आहे.