CoronaVirus : पिंपरीत 11 जणांचे रिपोर्ट मिळाले; 10 जण निगेटिव्ह

Eleven people infected Corona test report is negative in Pimpri
Eleven people infected Corona test report is negative in Pimpri

पुणे : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील 169 जणांचा आजपर्यंत पाठपुरावा केलेला आहे. पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरालॉजी (एनआयव्ही) प्रयोगशाळेकडे रविवारी प्रलंबित 11 जणांच्या घशातील द्रव्याच्या नमुन्यांपैकी दहा जणांचे नमुने प्राप्त झाले असून ते निगेटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली.

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पिंपरीतील वायसीएम आणि भोसरीतील नवीन रुग्णालयात कोरोनाग्रस्तांसाठी विलगीकरण कक्ष महापालिकेने सुरू केलेला आहे. संसर्ग झालेल्या नऊ जणांना तिथे ठेवले आहे. परदेशातून आलेले व त्यांच्या संपर्कात आलेल्या 169 जणांचा आतापर्यंत पाठपुरावा झाला आहे. त्यांना घरातच थांबण्याच्या सूचना दिल्या आहेत. अशा व्यक्तींचा शोध घेऊन त्यांचे समुपदेशन आणि मार्गदर्शन करण्यासाठी शंभर शीघ्र कृती दल तयार करण्यात आली आहेत. त्यात तीन महापालिका कर्मचारी व पोलिसांचा समावेश आहे. संबंधितांच्या घरी जाऊन "होम क्वारंटाईन' झाले आहे की नाही, याची खात्री केली जात आहे. संशयित आढळलेल्या भागात आरोग्य विभागातर्फे स्वच्छता केली जात आहे. कीटकनाशक फवारणी केली जात आहे. त्यासाठी 25 पथके केली असून आतापर्यंत त्यांनी 20 हजार घरांच्या परिसरात फवारणी केलेली आहे.

Coronavirus: पुण्यात आजपासून तीन दिवस व्यापार बंद 

नकारात्मक दृष्टिकोन नसावा
कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींचे विलगीकरण केले आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. परदेशातून आलेल्या व्यक्तींची तपासणी केलेली आहे. कोरोनाची लक्षणे न आढळलेल्यांना खबरदारी म्हणून 14 दिवस घरीच थांबण्याची सूचना केलेली आहे. अशा व्यक्तींना घराबाहेर जा किंवा सोसायटीत, इमारतीत येऊ नका, असे सांगणे चुकीचे आहे. त्यांच्या विषयी नकारात्मक दृष्टिकोन बाळगू नये, असे आवाहन आयुक्त हर्डीकर यांनी केले आहे.

Coronavirus : लोहगाव विमानतळावर शांतता; रिक्षा, टॅक्‍सी, कॅबसेवेला फटका

संपर्कासाठी ई-मेल, पत्र वापरा
महापालिका किंवा अन्य सरकारी, निमसरकारी कार्यालयांत नागरिकांनी जाऊ नये. जाणे गरजेचेच असेल तर संबंधित अधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी घ्यावी. शक्‍यतो आपले म्हणणे, पत्र, मेसेज, ई-मेलद्वारे अधिकाऱ्यांपर्यंत पोचवावा. महापालिका आयुक्तांचा ई-मेल आयडी commissioner@pcmcindia.gov.in असा आहे. त्यावर नागरिकांनी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले.

जादा 130 बेड सज्ज
महापालिकेची कंट्रोल रूम 24 तास सुरू आहे. वायसीएम व भोसरी रुग्णालय याशिवाय आणखी दोन रुग्णालयांत 130 बेडची व्यवस्था केलेली आहे. त्यात पिंपरीतील जिजामाता रुग्णालयात 100 बेड आणि नेत्र रुग्णालयात 30 बेडची व्यवस्था केलेली आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com