थकबाकी न भरल्यामुळे दहा मिळकती ‘सील’

Property-Seal
Property-Seal

पुणे - मिळकतकराच्या थकबाकीवरील व्याजात सवलत देऊनही थकबाकी न भरलेल्या मिळकतींना अखेर टाळे ठोकण्याची कार्यवाही महापालिकेने हाती घेतली आहे. ५० लाख रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या दहा मिळकती महापालिकेने बुधवारी ‘सील’ केल्या. पुढील दोन दिवसांत थकबाकी भरण्याची सूचना संबंधित मिळकतधारकांना केली आहे. तसेच येत्या ३० नोव्हेंबरपर्यंतच अभय योजना लागू राहणार असल्याचे महापालिकेच्या मिळकतकर विभागातर्फे सांगण्यात आले. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महापालिकेने २ ऑक्‍टोबरपासून लागू केलेल्या अभय योजनेतून ५० लाखांची थकबाकी असलेल्यांना त्यांच्या कराच्या दंडाच्या रकमेत ८० टक्के सवलत देण्यात आली आहे. त्यानुसार आतापर्यंत २३२ कोटी ४५ लाखांची थकबाकी वसूल झाली आहे. 

या योजनेतून किमान ४०० कोटींच्या वसुलीची आशा महापालिकेला आहे; मात्र योजनेची मुदत आता जेततेम ५ दिवस राहिल्याने अपेक्षित महसूल मिळण्याची शक्‍यता नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे थकबाकी भरण्याचा तगादा लावतानाच ती न भरणाऱ्यांच्या मिळकती ‘सील’ करण्याची कारवाई महापालिकेने सुरू केली आहे. 

याबाबत मिळकतकर विभागप्रमुख विलास कानडे म्हणाले, मिळकतधारकांना विशेषत: थकबाकीदारांना अभय योजनेतून सवलत दिली जात आहे. तरीही, ती भरत नसलेल्यांना नोटिसा देऊन मिळकती ‘सील’ करण्यात येत आहेत.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com