बारामतीत दहाची नाणी ठरते सर्वांची डोकेदुखी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018

बारामती शहर - दहा रुपयांच्या सुट्या नाण्यांच्या प्रश्नाने बारामतीकर हैराण झाले आहेत. शहरात बहुसंख्य व्यापारी व दुकानदारांकडून दहा रुपयांची नाणी स्वीकारली जात नाहीत. अनेक बॅंकाही नाणी ठेवायला जागा नसल्याच्या कारणांनी दहा रुपयांची नाणी स्वीकारत नसल्याने अनेकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. 

सध्या शहरातील बॅंकांकडे कोट्यवधी रुपयांची दहा रुपयांची नाणी पडून आहेत. ग्राहक ही नाणी घेत नाहीत आणि जबरदस्तीने जर एखाद्या बॅंकेने दिलीच तर लगेचच दुसऱ्या दिवशी याच नाण्यांचा भरणा संबंधितांकडून होत असल्याने बॅंकांपुढेही ही नाणी कुठे ठेवायची असा प्रश्न आहे. यासंदर्भात काही बॅंक व्यवस्थापकांशी संपर्क साधला असता, त्यांनी नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर दहा रुपयांची नाणी बॅंकांसाठी कटकट ठरत असल्याचे सांगितले. 

बॅंकांकडूनच नाणी स्वीकारण्यास टाळाटाळ केली जात असल्याने साहजिकच नाणी स्वीकारली आणि बॅंकांनीच ती स्वीकारली नाही तर आपल्याकडे दहाची नाणी पडून राहतील या भीतीपोटी अनेक जण एकतर नोट द्या किंवा पाचची दोन नाणी मागतात. मंडईपासून ते बाजारपेठेपर्यंत अनेक ठिकाणी अनेकांना हा अनुभव येत आहे.

बॅंकांकडून स्पष्ट खुलासाच नाही
स्टेट बॅंकेसह सर्वच बॅंकांनी नाणी स्वीकारण्याबाबत स्पष्टपणे खुलासा करावा अशी लोकांची मागणी आहे. रिझर्व्ह बॅंकेने जर नाणी काढली असतील तर ती नाकारता कशी येऊ शकतात, असा अनेकांचा सवाल आहे. बॅंकांनीही याबाबत संदिग्ध भूमिका घेतल्याने गोंधळात भर पडत आहे.

Web Title: Ten rupees coin issue