अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्याला 10 वर्षे तुरुंगवास 

jail
jail

पुणे : क्रिकेट खेळत असताना वरच्या मजल्यावर बॉल आणण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्याला न्यायालयाने 10 वर्षांची सक्तमजुरी आणि 5 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. व्ही. आदोणे यांनी हा निकाल दिला. 

किशोर रामप्रीत चौहान याला शिक्षा देण्यात आली. अत्याचार झालेल्या अल्पवयीन पीडित मुलीच्या वडिलांनी याबाबत विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. 23 ऑगस्ट 2015 रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास धानोरीतील एका इमारतीमध्ये हा प्रकार घडला होता. घटनेच्या दिवशी पीडित मुलगी ही तिच्या मोठ्या भावाबरोबर क्रिकेट खेळत होती. क्रिकेट खेळताना बॉल वरच्या मजल्यावर गेला होता. तो आणण्यासाठी पीडित मुलगी वर गेली. त्या वेळी चौहान याने तिच्यावर अत्याचार केला. बराच वेळ झाल्यानंतरही बहीण खाली न आल्याने तिचा भाऊ वर गेला.

त्या वेळी त्याने हा प्रकार पाहिला. त्याबाबत आई-वडिलांना माहिती दिल्यानंतर चौहानवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खटल्याचे कामकाज सरकारी वकील लीना पाठक यांनी पाहिले. त्यांनी एकूण 10 साक्षीदार तपासले. तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक सीता लोमटे यांनी गुन्ह्याचा तपास करून दोषारोपपत्र दाखल केले होते. दंडाच्या रक्कमेपैकी 5 हजार रुपये पीडित मुलीला देण्यात यावेत, असे आदेशात नमूद केले आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com