बलात्कारप्रकरणी तरुणाला दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा 

बलात्कारप्रकरणी तरुणाला दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा 

पुणे -  प्रेमाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या तरुणाला दहा वर्षे सक्तमजुरी आणि 15 हजार रुपये दंडाची शिक्षा सत्र न्यायाधीश एम. एम. देशपांडे यांनी सुनावली. 

ओंकार दत्तात्रेय दांगट (वय 23, रा. कोथरूड) असे शिक्षा झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत पीडित सोळा वर्षीय मुलीच्या वडिलांनी चतुःशृंगी पोलिसांत फिर्याद दिली होती. ही घटना ऑक्‍टोबर 2014 ते फेब्रुवारी 2015 दरम्यान घडली होती. प्रेमाच्या आमिषाने दांगट याने पीडित मुलीशी शरीरसंबंध ठेवले. त्यातून गर्भवती राहिल्याने तिने बाळाला जन्म दिला आहे. खटल्यात अतिरिक्त सरकारी वकील पुष्कर सप्रे यांनी आठ साक्षीदार तपासले. त्यामध्ये पीडितेची साक्ष आणि जन्मलेल्या बाळाची "डीएनए' चाचणी महत्त्वाची ठरली. 

दंडाची रक्कम पीडितेला नुकसानभरपाई स्वरूपात देण्यात यावी आणि दोषीने दंड न भरल्यास त्याला अतिरिक्त सहा महिने कारावास भोगावा लागेल, असे न्यायालयाने निकालात नमूद केले आहे. 

पोलिस उपनिरीक्षक स्मिता पाटील यांनी या प्रकरणाचा तपास केला. त्यांना न्यायालयीन कामकाजासाठी सहायक पोलिस फौजदार कमलाकर गायकवाड, कॉन्स्टेबल संतोष धादवड, कॉन्स्टेबल माया जमदाडे यांनी मदत केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com