"सौरऊर्जा'ची निविदा मंजुरीसाठी 

"सौरऊर्जा'ची निविदा मंजुरीसाठी 

पुणे - महापालिकेच्या इमारतीवर सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याची निविदा दोन वर्षांनंतर स्थायी समितीसमोर मान्यतेसाठी ठेवण्यात आली आहे. पूर्वी ठरविलेल्या अटी आणि शर्तीही बदलण्यात आल्या आहेत. 

महापालिकेच्या इमारतीवर 825 किलोवॉट इतकी वीजनिर्मिती होईल असा प्रकल्प उभा करण्यासाठी 2016 मध्ये निविदा मागवण्यात आल्या होत्या. या निविदा प्रक्रियेला जानेवारी 2017 मध्ये मुदतवाढ दिली गेली. त्यानंतर जुलै 2017 महिन्यात निविदा उघडण्यात आल्या. निविदेची प्रक्रिया पूर्ण झाली; पण प्रत्यक्षात प्रस्ताव हा आत्ता स्थायी समितीच्या मान्यतेसाठी ठेवण्यात आला आहे. अहमदाबाद येथील एका कंपनीला हे काम देण्यात आले आहे. वीज खर्च बचतीच्या धोरणानुसार आणि अपारंपरिक ऊर्जेचा वापर करण्यासाठी महापालिकेच्या विविध इमारतींवर सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यासाठी जुलै 2016 मध्ये ऊर्जा नियोजन प्रा. लि. या कंपनीला सल्लागार म्हणून नियुक्त केले होते. महापालिकेच्या एकूण 34 इमारतींवर सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचे नियोजन टप्प्याटप्प्याने करण्यात आले आहे. 

प्रकल्पासाठी 4 कोटी 95 लाखांची तरतूद 
महापालिका प्रशासनाने 2017-18 च्या अंदाजपत्रकामधील अपूर्ण कामासाठी 2018-19 च्या अंदाजपत्रकामध्ये तरतूद केली आहे. 

या प्रकल्पासाठी 4 कोटी 95 लाख इतकी तरतूद केली आहे. एप्रिल महिन्यात तरतूद उपलब्ध झाली असताना निविदा ऑक्‍टोबर महिन्यात स्थायी समितीसमोर मान्यतेसाठी आणली आहे. या निविदा प्रक्रियेत 5 जणांनी निविदा दाखल केल्या होत्या, त्यापैकी तीन ठेकेदार अपात्र ठरले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com