मुळा नदीपात्रातील जलपर्णी काढण्याच्या कामाची निविदा

रमेश मोरे
शुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018

जुनी सांगवी - जुनी सांगवी येथील मुळा नदीपात्रात जलपर्णीची वाढ होवु लागल्याने नदीपात्रात जलपर्णीचे पुंजके फोफावताना दिसु लागले आहेत. जलपर्णीमुळे डास किटकांचा त्रास सांगवीकरांसाठी नवीन नाही. गेल्यावर्षी जुन अखेरपर्यंत सांगवीकरांना डासांच्या त्रासाचा सामना करावा लागला होता. प्रशासनाकडुन जलपर्णी हटविण्याचे काम धिम्या गतीने करण्यात आले होते. तर डासाच्या त्रासाला कंटाळुन नागरीकांच्या आरोग्यासाठी काही सामाजिक संस्था, संघटना व पर्यावरणप्रेमी नागरीकांनी पुढाकार घेवुन जलपर्णी हटविण्याचे काम केले होते. सध्या मुळानदीपात्रात जलपर्णी वाढु लागल्याने डास किटकांच्या उत्पत्तीत वाढ होवु लागली आहे.

जुनी सांगवी - जुनी सांगवी येथील मुळा नदीपात्रात जलपर्णीची वाढ होवु लागल्याने नदीपात्रात जलपर्णीचे पुंजके फोफावताना दिसु लागले आहेत. जलपर्णीमुळे डास किटकांचा त्रास सांगवीकरांसाठी नवीन नाही. गेल्यावर्षी जुन अखेरपर्यंत सांगवीकरांना डासांच्या त्रासाचा सामना करावा लागला होता. प्रशासनाकडुन जलपर्णी हटविण्याचे काम धिम्या गतीने करण्यात आले होते. तर डासाच्या त्रासाला कंटाळुन नागरीकांच्या आरोग्यासाठी काही सामाजिक संस्था, संघटना व पर्यावरणप्रेमी नागरीकांनी पुढाकार घेवुन जलपर्णी हटविण्याचे काम केले होते. सध्या मुळानदीपात्रात जलपर्णी वाढु लागल्याने डास किटकांच्या उत्पत्तीत वाढ होवु लागली आहे. जलपर्णी वाढुन मुळानदीपात्र आच्छादण्याआधीच प्रशासनाकडुन जलपर्णी काढण्यास सुरूवात करावी. 

अशी मागणी नागरीकांच्या वतीने मनसेचे राजु सावळे यांनी पालिका प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की परिसरात जलपर्णीमुळे डासांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. दरवर्षी प्रशासन या कामासाठी ठेका देते मात्र तसे काम केले जात नाही सर्वसामान्य नागरीक सामाजिक संस्थांनी गतवर्षी नागरीकांच्या सहकार्याने जलपर्णी काढण्याचे काम केले होते. सध्या मुळानदीपात्रात जलपर्णीची वाढ होत आहे. नदी किनारा रहिवाशांना डासांच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. ही बाब लक्षात घेवुन सध्या काही पर्यावरणप्रेमी नागरीक, सांगवीतील हर्षल ढोरे यांच्या बालाजी प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांकडुन मुळानदीपात्रातील जलपर्णी काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.  

प्रशासनाकडे या समस्येचा पाठपुरावा करून शहराच्या इंद्रायणी, मुळा, पवना ईत्यादी नद्यांच्या  निविदा काढण्यात आल्या आहेत.
- हर्षल ढोरे नगरसेवक

शहरातील सर्व नद्यांच्या निविदा काढण्यात आल्या आहेत. ठेकेदारांनी वर्क आऊटची वाट न पहाता प्रत्यक्ष कामाला सुरूवात करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. मनोज लोणकर.
- आरोग्य कार्यकारी अधिकारी पिं.चि.म.न.पा.

Web Title: Tender for the removal of jalpanri