पाचशे ई-बसच्या निविदा सात दिवसांत

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 जुलै 2018

पुणे - शहर आणि पिंपरी- चिंचवडमधील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी ५०० ई-बस भाडेतत्त्वावर घेण्याच्या प्रस्तावावर स्मार्ट सिटीच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत दोन्ही महापालिका आणि पीएमपीमध्ये मंगळवारी एकमत झाले. दोन ऑगस्ट दरम्यान याबाबतच्या निविदा मागविण्यात येणार असून, जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात २५ बस दोन्ही शहरांत धावतील, यादृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. 

स्मार्ट सिटीच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत निविदा, त्यातील अटी-शर्ती यांचे सादरीकरण करण्यात आले. तसेच, चार्जिंग स्टेशनसाठी जागा, त्यासाठीचा आराखडा आदींबाबतही चर्चा झाली आणि त्यानुसार उपाययोजना करण्याचे ठरले. पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, स्थायी समितीचे अध्यक्ष योगेश मुळीक, पिंपरी महापालिका स्थायीच्या अध्यक्षा ममता गायकवाड, पीएमपीचे संचालक सिद्धार्थ शिरोळे, दोन्ही महापालिकांचे आयुक्त अनुक्रमे सौरभ राव, श्रावण हर्डीकर, पीएमपीच्या अध्यक्षा नयना गुंडे, सीआयआरटीचे प्रतिनिधी या वेळी उपस्थित होते. 

५०० ई-बसच्या निविदा मागविण्यात येणार असल्या, तरी पहिल्या टप्प्यात १५० आणि दुसऱ्या टप्प्यात ३५० बस घेण्याचे या वेळी ठरले. त्यासाठी पायाभूत सुविधांची पूर्तता वेगाने करण्याचे ठरले. बसची देखभाल- दुरुस्ती आणि त्या उभ्या करण्यासाठीच्या जागेची जबाबदारी संबंधित कंपनीची असेल, असे या वेळी सांगण्यात आले. दरम्यान, दोन्ही महापालिकांच्या निधीतून ५०० बस विकत घेण्यात येणार आहेत. त्यासाठीची निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यातील ४०० सीएनजीवर आणि १०० डिझेलवर धावणाऱ्या असतील, असे यापूर्वी संचालक मंडळाने ठरविले होते. परंतु, डिझेलच्या बसची खरेदी करायची नाही, असा मुख्यमंत्र्यांचा आदेश असल्यामुळे उर्वरित १०० बसही सीएनजीवरील घ्यायच्या असेही या वेळी ठरल्याची माहिती शिरोळे यांनी दिली. दरम्यान, पीएमपीच्या संचालक मंडळाची बैठक ३० जुलै रोजी होणार आहे, त्यात उर्वरित प्रशासकीय प्रक्रियेला मंजुरी देण्यात येईल. 

Web Title: tender seven days of five hundred e-buses