तेंडुलकरांच्या नाटकांतून राष्ट्रीय रंगभूमीची निर्मिती 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 जानेवारी 2017

पुणे - ""नाटकाला थेट भिडण्याची ताकद विजय तेंडुलकरांमध्ये होती. आपल्या नाटकांद्वारे राष्ट्रीय रंगभूमी निर्माण करण्याचे काम त्यांनी केले. आजही तेंडुलकरांची नाटके नव्या तंत्राद्वारे देशभरात पोचविण्याचे काम तरुण प्रामाणिकपणे करत आहेत,'' असे मत ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांनी शुक्रवारी व्यक्त केले. 

डॉ. चंद्रशेखर बर्वेलिखित "विजय तेंडुलकरांची नाटके' या पुस्तकाच्या द्वितीय आवृत्तीचे प्रकाशन डॉ. पटेल यांच्या हस्ते झाले. या वेळी अभिनेते डॉ. मोहन 

आगाशे, तेंडुलकर यांचे लहान बंधू आणि व्यंग्यचित्रकार मंगेश तेंडुलकर, तेंडुलकर यांच्या कन्या तनुजा मोहिते, लेखक डॉ. बर्वे उपस्थित होते. 

डॉ. पटेल म्हणाले, ""तेंडुलकरांची अनेक नाटके माझ्या वाट्याला आली. माणूस आणि त्याच्या जगण्याचे तर्कशास्त्र काय आहे, हे समजून सांगण्याचे काम तेंडुलकरांनी केले. कलेच्या प्रांतात माझ्यासारख्या नवख्याला पुढे आणण्याबरोबरच तत्कालीन राजकीय, सामाजिक भान आमच्यात निर्माण करण्याचेही काम त्यांनी केले.'' 

तेंडुलकर म्हणाले, ""सभोवतालच्या परिस्थितीत माणसाचा कोंडमारा, त्यांच्या खास गोष्टी आणि विसंवाद आपल्या साहित्यात टिपण्याचे काम विजयने केले. 

माणसांच्या स्वभावाचा शोध त्याने साहित्यातून घेतला. विजयने आपल्या लेखनातील ताकद शेवटपर्यंत टिकविली. "सखाराम बाईंडर'नंतर मी काळजी व्यक्त करणारे पत्र त्याला लिहिले. त्यावर आपल्या भूमिकेवर ठाम राहत आणि कुठलीही तडजोड न करता प्रत्येक प्रसंगाला सामोरे जाण्याची तयारी ठेवल्याचे त्याने सांगितले होते.'' 

डॉ. आगाशे म्हणाले, ""ऐकावे कसे, शिकावे कसे आणि कसे समजून घ्यावे, अशा अनेक गोष्टींचे भान आमच्यात निर्माण करण्याचे काम तेंडुलकर यांनी केले. तेंडुलकर, महेश एलकुंचवार आणि सतीश आळेकर यांच्या नाटकांचा उपयोग माणसे समजून घेण्यासाठी झाला.'' 

डॉ. बर्वे म्हणाले, ""जीवनाचा सखोल शोध घेण्याचे काम तेंडुलकर यांनी केले. समग्र तेंडुलकर समजून घेण्यासाठी त्यांची नाटके वाचावीच लागतात. वाचकांना तेंडुलकर समजून घेता यावेत, म्हणूनच या पुस्तकाची निर्मिती केली.'' 

सारे काही तेंडुलकर..! 
तेंडुलकरांचे साहित्यवैभव, त्यांची विचारशक्ती, त्यांचे व्यक्तिमत्त्व, त्यांचे बालपण यावर वक्‍ते प्रकाश टाकत होते. तेंडुलकर यांच्या कन्या तनुजा मोहिते भावूक झाल्याने त्यांनी डॉ. बर्वे यांना लिहिलेला संदेश निवेदिका मंजिरी जोशी यांनी वाचून दाखविला. त्या वेळी प्रेक्षकही काही क्षण भावनिक झाले.

Web Title: Tendulkar's plays produced national theater