पुण्यात भीषण अपघात; नवले पुलावर ट्रक उलटला, दोन जखमी

कात्रज देहू बाह्यमार्गावर नवले पुला जवळ सकाळी साडे अकराच्या सुमारास रेडिमिक्स सिमेंट काँक्रीटचा मिक्सर पलटी
Terrible accident in Pune Navle bridge
Terrible accident in Pune Navle bridge

धायरी - कात्रज देहू बाह्यमार्गावर नवले पुला जवळ सकाळी साडे अकराच्या सुमारास रेडिमिक्स सिमेंट काँक्रीटचा मिक्सर पलटी झाला आहे. कात्रज कडून नवले पुलाकडे येत असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने  हा विचित्र अपघात झाला. (Pune Navle bridge accident)

सिमेंटचा मिक्सर एका चारचाकीवर पलटी झाल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. या अपघातात २ जण जखमी असून चारचाकी गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सकाळची वेळ असल्याने या अपघातामुळे वाहतूक कोंडी देखील झाली. भारती विद्यापीठ वाहतूक पोलिस घटनास्थळी दाखल झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com