शिरूरमधील बिबटे झाले "स्मार्ट'

Bibtya
Bibtya

टाकळी हाजी : शिरूर तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात बिबट्याची दहशत पसरली आहे. वनविभागाने जांबूत येथे आठ पिंजरे लावले असले तरी तीन दिवसांत एकाही पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला नाही. अनेक ठिकाणी बिबट्याचे दर्शन होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

"सावधान. काही वेळापूर्वी न्याहार मळ्यात व पिंपरखेड रस्त्यावर बिबट्या दिसला. मुलांना घराबाहेर पाठवू नका. शेतात काम करताना सावधानता बाळगा'', असा सल्ला सध्या सोशल मीडियावर फिरताना दिसू लागला आहे. जांबूत (ता. शिरूर) येथे तीन दिवसांपूर्वी दोन वर्षाच्या चिमकुलीला बिबट्याने ठार केले. तेव्हापासून या परिसरात घबराहट पसरली आहे. परिसरात बिबट्या नरभक्षक बनल्याने त्याला पकडण्याची जबाबदारी वनविभागाची आहे. मात्र, आठ पिंजरे लावून देखील या पिंजऱ्यात बिबट्या अडकत नाही. मात्र, नागरिकांना बिबट्या दिसत असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत.

जांबूत (ता. शिरूर) येथे प्रशांत जोरी यांचा शेतमजूर संदीप लोखंडे यांच्यावर बिबट्याने हल्ला केला. पण ते थोडक्‍यात बचावले. मात्र त्यांच्या पाच कोंबड्या बिबट्याने फस्त केल्या. वनविभागाने लावलेल्या पिंजरा व जोरी यांच्या घराजवळ बिबट्याचे ठसे आढळून आले आहे. या बिबट्याने झाडावर वरखडे काढल्याचे निर्दशनास आले आहे. त्यावरून हा बिबट संतापलेला व भुकेलेला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे.

पाऊलखुणा तपासातून प्राथमिक अंदाजानुसार पट्टेरी वाघ नाही. या भागात 20 कॅमेरे व 8 पिंजरे लावलेले आहेत. बिबट हा हुशार प्राणी असून पिंजरा लावल्याने तयार झालेला नवीन भाग त्याला समजतो. कोंबड्या, शेळ्या, मेंढ्या या सहजतेने भक्ष होतात. त्यामुळे तो अडचणीच्या ठिकाणी पिंजऱ्यात अडकत नाही.
- डॉ. अजय देशमुख, पशुवैद्यकीय अधिकारी, माणिकडोह, बिबट निवारा केंद्र

 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com