गावात कुत्र्यांपेक्षा बिबटे झाले जास्त

Bibtya
Bibtya

टाकळी हाजी (पुणे) : फारशी धावपळ न करता अगदी सहजासहजी शिकार सापडत असल्याने बिबट्यांनी आपला मोर्चा आता भटक्‍या आणि पाळीव कुत्र्यांकडे वळविला आहे. गेल्या काही महिन्यांत टाकळी हाजी (ता. शिरूर) परिसरातील अनेक गावांत बिबट्याने कुत्र्याचा फडशा पाडल्याच्या घटना घडल्या आहेत. त्याचा परिणाम कुत्र्यांची संख्या घटण्यात झाली आहे. विशेषतः नदीकाठी असणाऱ्या गावात असे चित्र प्रकर्षाने दृष्टीला पडत आहे.

पाळीव कुत्र्यांचा फडशादेखील बिबट्या पाडत आहेत. कुक्कुटपालनाच्या शेडमधून कोंबड्या फस्त केल्या जात आहे. मेंढपाळांची कुत्रीदेखील बिबट्याचे लक्ष्य होत आहे. पाळीव कुत्र्यांना बिबट्याच्या भीतीने रात्रीच्या वेळी बाहेर न सोडता घरातच बांधून ठेवले जात आहे. जांबूत येथील वासुदेव सरोदे यांच्या पाळीव कुत्र्यांवर बिबट्याने हल्ला करून जखमी केले.

परतीच्या पावसाने शिवारातील पिकांचे नुकसान झाले आहे. उरल्यासुरल्या पिकांचे रक्षण करायचे असल्यास शेतात जाण्यास भीती वाटत आहे. कारण, बहुतेक शेतात बिबट्याच्या पाऊलखुणा दिसून येत आहेत. दिवसाढवळ्या बिबट्या दिसत आहे.
- प्रशांत जोरी, शेतकरी

बिबट्याला सहजपणे भक्ष्य मिळू लागले आहे. त्यामुळे परिसरातून बिबट्या दुसरीकडे जात नाही. शिवाय पिंजऱ्यातदेखील अडकत नाही. रात्रीच्या वेळी भयानक रूप धारण केलेला, पूर्ण वाढ झालेला बिबट्या पाहिल्याने भीतीचे वातावरण आहे.
- सुनीता जोरी

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com