बिबट्याचेही, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन...

Bibtya
Bibtya

निरगुडसर (पुणे) : येथील भोंडवेमळ्यात आज पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास बिबट्याने एका शेळीवर हल्ला करून 50 फुटापर्यंत फरफटत ओढून नेले. परंतु, मेंढपाळ भाऊ शिंगटे यांनी आरडाओरड केल्यानंतर बिबट्या शेळीला सोडून पसार झाला. मात्र, त्यानंतर 10 मिनिटात दोन बिबटे पुन्हा तेथे आले. परंतु, बॅटरीचा प्रकाशझोत व मोठा आवाज केल्याने बिबट्यांनी तेथून धूम ठोकली. परंतु, बिबट्याने हल्ला केलेली शेळी ठार झाली. 

निरगुडसर (ता. आंबेगाव) येथील भोंडवेमळ्यातील अजय भोंडवे यांच्या शेतात रविवारी सायंकाळी मेंढपाळ भाऊ शिंगटे (रा. ढवळपुरी जि. नगर) यांचा वाडा मुक्कामी होता. सोमवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास मेंढ्यांच्या वाड्यावर बिबट्याने हल्ला केला. त्यामुळे मेंढ्या जोरजोरात ओरडू लागल्या. त्यामुळे मेंढपाळ शिंगटे व त्यांच्या कुटुंबीयांना जाग आली. तोपर्यंत बिबट्याने शेळीला 50 फुटापर्यंत फरफटत ओढून नेले होते. शिंगटे यांनी आरडाओरडा केल्यामुळे बिबट्या शेळीला सोडून पसार झाला, परंतु बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार झाली होती. त्यानंतर 10 मिनिटात पुन्हा दोन बिबटे उसाच्या बाहेर येऊन शेळीला सोडलेल्या ठिकाणी येऊन डरकाळ्या फोडू लागले. परंतु, मेंढपाळ शिंगटे व शेतकरी अजय भोंडवे यांनी जोराचा आवाज केल्यानंतर बिबटे तेथून पसार झाले. 

वन विभागाने घटनास्थळी येऊन पंचनामा केला. शेळी ठार झाल्याने मेंढपाळाचे 10 हजाराहून अधिक रुपयांचे नुकसान झाले आहे. बिबट्याच्या हल्ल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने येथे पिंजरा लावून बिबट्यास जेरबंद करण्याची मागणी राहुल हांडे व अजय भोंडवे यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com