Pune Crime: महिलांच्या भांडणात कोयता गँगची उडी, पोलिसांच्या समोरच सपासप वार, CCTV फुटेज व्हायरल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune Crime

Pune Crime: महिलांच्या भांडणात कोयता गँगची उडी, पोलिसांच्या समोरच सपासप वार, CCTV फुटेज व्हायरल

पुण्यात पोलिसांकडून योग्य ती कारवाई केल्यानंतरही पुन्हा एकदा कोयता गँगची दहशत समोर आली आहे. हडपसर भागामध्ये दोन टोळ्यांमधील गुन्हेगारांनी एकमेकांवर कोयत्याने केलेल्या हल्ल्यामध्ये तीन जण जखमी झाल्याची घटना समोर आली आहे.

ससून रुग्णालयाच्या आवारात घडलेल्या प्रकारानंतर काल (शुक्रवारी) हडपसर भागातील रामटेकडी परिसरातील दोन गुन्हेगारी टोळ्यांमध्ये वाद झाला होता. या वादानंतर दोन्ही टोळ्यांतील आरोपींनी एकमेकांवर कोयत्याने वार करायला सुरवात केली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले, त्यांनी या प्रकरणातील आरोपींना ताब्यात घेतलं. घडलेला सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

दरम्यान यापूर्वीही पुण्यात काही गुन्हेगारांच्या टोळ्यांनी हातात कोयता घेऊन दहशत निर्माण केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या प्रकरणातील काही आरोपींनाही पोलिसांनी अटक केलं आहे. कोयता गँगचा नायनाट करण्यासाठी पोलिसांनी पुण्यात कोयता खरेदी करण्यासाठी आधार कार्ड सक्तीचं केलं होतं.

पोलिसांनी याआधी बऱ्याचदा कारवाई करूनही या घटना थांबताना दिसत नाहीत. या घटनांमुळे परिसरात खळबळ निर्माण झाली आहे.

टॅग्स :Pune NewsCrime News