पोलिस उपनिरीक्षक नितीन मोहिते गोळीबारात जखमी

पोलिस उपनिरीक्षक नितीन मोहिते गोळीबारात जखमी

वङगाव मावळ - पुणे-मुंबई महामार्गावरील साते येथील फ्लेवर्स हॉटेलमध्ये दोन गटात झालेली भांडणे सोडविण्यासाठी गेलेले वडगाव पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक नितीन मोहिते हे एकाने केलेल्या गोळीबारात जखमी झाले. ही घटना शुक्रवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास घडली. 

पोलिसांनी या प्रकरणी तिघांना ताब्यात घेतले आहे. दादा बाळू ढवळे (वय ३८,रा. पुनावळे), सुनील विलास पालखे (वय २७, रा. जांबे) व संतोष उर्फ बिट्या बाळासाहेब गायकवाड (वय २१, रा.जांबे, ता. मुळशी) अशी याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हॉटेल फ्लेवर्समध्ये भांङण सुरु असल्याची माहिती मिळाल्यावरून मोहीते सहकाऱ्यांसह तेथे गेले होते. हॉटेलच्या पार्किंगमध्ये मनोज सिध्दाय्या तेलगु (वय 29) व त्यांचे मित्र (रा.देहुरोड) यांचा दादा ढवळे व त्याच्या सहकाऱ्यांशी वाद झाला होता. ते हॉटेलमध्ये आहेत व त्यांच्याजवळ शस्त्र आहे असे समजल्याने मोहीते हे त्याला ताब्यात घेण्यासाठी हॉटेलच्या आत गेले असता दादा ढवळे हा टॉयलेट मधुन बाहेर येताना दिसला. मोहीते यांनी त्याला बाहेर चल असे म्हणून त्यास व त्याचे दोन साथीदार सुनील पालखे व संतोष गायकवाड यांना ताब्यात घेत असताना ढवळे याने त्याच्या कमरेला लावलेले रिव्हालव्हर काढुन मोहीते यांच्या उजव्या पायाच्या मांडीवर गोळी मारली. त्यांना उपचारासाठी सोमाटणे येथील पवना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. त्यांची प्रकृती ठीक असून धोक्याच्या बाहेर आहे. 

पोलिसांनी या प्रकणातील तिन्ही आरोपिंना रिव्हॉल्व्हरसह ताब्यात घेतले आहे.
 पुढील तपास पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com