ऑनलाइन शिक्षणाचा ‘श्रीगणेशा’

ऑनलाइन शिक्षणाचा ‘श्रीगणेशा’

पुणे : शाळेचे प्रवेशद्वार आणि वर्ग खोल्यांमध्ये फुले, फुगे अशी आकर्षक सजावट, फळ्यावर छान स्वागतपर संदेश लिहिणे, विविध उपक्रमांचे आयोजन अशा उत्साही वातावरणात मंगळवारी शाळेचा पहिला दिवस साजरा झाला. होय, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सलग दुसऱ्यावर्षीही शाळा प्रत्यक्ष न भरता ऑनलाइनद्वारे सुरू झाल्या. परंतु, घरात बसून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेच्या वातावरणाची, शाळेत होणाऱ्या पहिल्या दिवसाच्या स्वागताची अनुभूती देण्यासाठी शाळांनी नावीन्यपूर्ण उपक्रम राबवीत विद्यार्थ्यांचे शाळेत ऑनलाइनद्वारे स्वागत केले.

ऑनलाइन शिक्षणाचा ‘श्रीगणेशा’
पिंपरी-चिंचवड शहरातील निर्बंध कायम!

कोरोनाच्या संसर्गामुळे शाळा बंद असल्या तरी विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण अधिकृतरीत्या मंगळवारपासून सुरू झाले. विद्यार्थी प्रत्यक्षात शाळेत येणार नसले तरीही ऑनलाइनद्वारे त्यांना शाळेत आल्याचा अनुभव देण्यासाठी अनेक शाळांमध्ये आकर्षक सजावट केली होती. त्याची पूर्वतयारी करण्यासाठी शिक्षक स्वत: गेल्या आठवड्यापासून हौसेने शाळेत येत असल्याचे पाहायला मिळाले. काही शाळांमध्ये पहिलीत म्हणजे पहिल्यांदा शाळेत प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांना थेट त्यांच्या घरी जाऊन शालेय साहित्य देण्यात आले.

नवीन मराठी शाळेत ऑनलाइन प्रवेशोत्सव उत्साहात साजरा झाला. पालकांनाही घरात सजावट करून विद्यार्थ्यांचे औक्षण करण्याची सूचना शाळेने केली होती. त्याप्रमाणे घरोघरी विद्यार्थ्यांचे औक्षण करण्यात आले आणि ते फोटो शाळेच्या व्हॉटस्‌ॲप ग्रुपवर शेअर करण्यात आले, अशी माहिती मुख्याध्यापिका कल्पना वाघ यांनी दिली.

ऑनलाइन शिक्षणाचा ‘श्रीगणेशा’
पुणे शहरात 187 तर जिल्ह्यात 826 नवे रुग्ण

विद्यार्थी करताहेत हे ‘मिस’

- प्रत्यक्ष शाळेत प्रवेश करणे

- वर्गात बाकावर बसून शिकणे

- मित्र-मैत्रिणींना, शिक्षकांना प्रत्यक्ष भेटणे

- एकत्र शिकणे, मस्ती करणे

- शाळेच्या मैदानावर खेळणे

- शाळा भरण्याची व सुटण्याची घंटा

- एकत्र बसून डब्बा खाणे

ऑनलाइन शिक्षणात मुलांना हे आवडतंय

- खूप आकर्षण असलेली गॅझेट वापरायला मिळणे

- ‘ग्राफिक्स’च्या साहाय्याने अभ्यास शिकणे

- ऑनलाइनद्वारे शिकणे वाटतंय भारी

- आई-वडिलांप्रमाणे ‘व्हर्च्युअली’ मित्रांना, शिक्षकांना भेटण्याची मज्जा

गेल्यावर्षी मुलांनी घरात राहूनच शिक्षण घेतले. यंदाही शाळा ऑनलाइन पद्धतीनेच सुरू होत आहेत. अर्थात, मुले यापूर्वी शाळेत गेलेली आहेत. त्यामुळे त्यांना प्रत्यक्ष शाळेची ओढ लागली आहे. ऑनलाइन शाळेतही ते उत्साहाने सहभागी होत आहेत. परंतु, हा उत्साह फारकाळ टिकून राहत नाही, हेही तितकेच खरे आहे.

-अर्चना सावंत, पालक

ऑनलाइन शिक्षणाचा ‘श्रीगणेशा’
पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्प शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच : अमोल कोल्हे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com