
नाद करा पण शेतकऱ्याचा कुठं! फॉर्च्युनरमधून घेऊन आला घोडीला Video Viral
पुणे जिल्ह्यातील एक शेतकरी सध्या सोशल मिडियावर चांगलाच चर्चेत आला आहे, त्याने आपल्या घोडीला चक्क फॉर्च्युनरमधून घरी आणलंय. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
शिरुर तालुक्यातील ढोक सांगवी गावच्या किरण दगडू पाचंगे यांनी अहमदनगरमधून 5 महिन्याची घोडी 25 हजारांत विकत घेतली. तिला फॉर्च्युनर कारमध्ये बसवुन घरी आणले.या घोडीला कारमधून उतरवतानाचे व्हिडीओ एका चांगलाच व्हायरल झाला आहे. शेतकरी आपल्या कोणत्याही जनावरांना आपल्या मुलांप्रमाणे जपतो. हे या व्हिडिओमधून दिसून येत आहे.
पुणे जिल्ह्यात बैलगाडा शर्यतींचं प्रचंड वेड आहे. त्याचबरोबर बैलगाडा शर्यतींचं मोठ्या प्रमाणात आयोजन केलं जातं. त्यात या परिसरातील बैलगाडा हा चार बैलांचा असतो. या शर्यतीत 2 बैल आणि घोडी असते. शर्यतीत बैलांना दिशा दाखवण्याचे काम घोडी करते. त्यामुळे शर्यतीतही त्यांना फार महत्त्व आहे.
या कारणांमुळे शेतकरी आपल्या जनावरांची खूप काळजी घेतात. शर्यतीसाठी घोडीचं लहान शिंगरू( पिल्लू ) आणून त्याची लहानपनापासून काळजी घेत तिला शर्यतीसाठी तयार केलं जातं. पळणाऱ्या बैलांना जशी लाखात किंमत मिळते, तशीच घोडीला सुद्धा लाखो रुपयांची किंमत मिळते.