Ravindra Dhangekar : कसब्याचे नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकरांची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ravindra Dhangekar

Ravindra Dhangekar : कसब्याचे नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकरांची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया...

कसबा पोटनिवडणुकीचा निकाल हाती आला आहे. कसब्यात काँग्रेसने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. भाजपच्या पारंपारिक मतदारसंघात काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांनी विजय मिळवत भाजपच्या हेमंत रासने यांचा पराभव केला आहे. कसब्यात यंदा भाजप आणि मविआमध्ये काटे की टक्कर दिसून आली. काँग्रेसचे रवींद्र धंगेकर पहिल्या फेरीपासून आघाडीवर होते.

विजयानंतर रवींद्र धंगेकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलताना धंगेकर म्हणाले की, "जनतेचा माझ्यावर विश्वास आहे. त्यामुळे ते मतांच्या रुपात आपल्याला दिसत आहे, असं रवींद्र धंगेकर यांनी म्हटलं आहे.

"ज्या दिवशी माझ्या विरोधात प्रचार करण्यासाठी भाजपला 40 स्टार प्रचारकांची फौज पाठवावी लागली शिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रचारासाठी उतरावं लागलं होतं. त्याचवेळी मी निवडणूक जिंकलो होतो, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. हा जनतेचा विजय आहे," असंही ते म्हणाले आहेत.

हा जनतेचा विजय आहे. महाविकास आघाडीचे नेते, कार्यकर्ते आणि मतदर यांचा हा विजय असल्याचं रवींद्र धंगेकर यांनी म्हंटलं आहे.

भाजप उमेदवार हेमंत रासने यांचा धक्कादायक रित्या पराभव झाला आहे. 'काटे की टक्कर' अशी ही लढत पाहिला मिळाली होती. मात्र काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांनी ११०४० मतांनी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव केला आहे.

पहिल्या फेरीपासून रवींद्र धंगेकर आघाडीवर असल्याचे दिसून आले होते. पाचव्या फेरीनंतर हेमंत रासने रवींद्र धंगेकर यांच्याशी चुरस करताना दिसून आले मात्र धंगेकर यांनी पुन्हा एकदा विजयी आघाडी घेतली आणि दणदणीत विजय मिळवला.