Pune Crime: चपात्या की आईस्क्रीम? लेकींनी केली वडिलांना बेदम मारहाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pune chandan nagar crime

Pune Crime: चपात्या की आईस्क्रीम? लेकींनी केली वडिलांना बेदम मारहाण

पुणेः वडिलांनी आईस्क्रीम फेकून दिल्याचा राग आल्याने मुलींनी आईच्या मदतीने वडिलांना बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. आई आणि मुलींनी मारहाण करत वडिलांचे डोके भिंतीवर आदळले. हे प्रकरण आता थेट पोलिस ठाण्यात पोहोचले आहे.

हा प्रकार पुण्यातील वडगाव शेरी भागात घडला आहे. सतीन जाधव (५१) यांनी यासंबंधी पोलिसात फिर्याद दिली आहे. शामला जाधव (५३), स्नेहल अमोलिक (३८) आणि तेजस्वी अमोलिक (३४) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जाधव हे नेहमीप्रमाणे २ डिसेंबर रोजी घरी आले असता त्यांच्या मुलींना बाहेरून येताना आईस्क्रीम घेऊन आले होते. "मी ४ चपात्या खाणारा माणूस आहे या आईस्क्रीम ने माझे पोट भरणार नाही" असे जाधव यांनी सांगितले आणि आईस्क्रीम फेकून दिलं.

बाहेरून पैसे देऊन आणलेले आईस्क्रीम फेकून दिल्याचा राग त्या दोन्ही मुलींना आला. या दोन्ही मुलींनी त्यांच्या आईची मदत घेत वडिलांना लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली तसेच त्यांचे डोके भिंतीवर जोरात आदळले. भिंतीवर डोके आदळल्यामुळे जाधव यांच्या मेंदूला जबर मार बसला असून ते गंभीर जखमी झाले आहेत.

हेही वाचा: Himachal Pradesh Result: मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेसमध्ये लॉबिंग? आज शिमल्यात गोपनीय बैठक

या तिघींवर आता चंदननगर पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम ३२३, ३३७, ३३८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

टॅग्स :punecrimeIce Cream