द कश्‍मिर फाईल्स...एक अर्धसत्य'च्या कार्यक्रमानंतर दोघांकडून आरडाओरडा

कोथरुडमधील गांधी भवन येथे "द कश्‍मिर फाईल्स...एक अर्धसत्य' या विषयावरी व्याख्यानाचा कार्यक्रमाच्या समारोपावेळी दोघांनी आरडाओरडा केल्याचा प्रकार घडला.
pune crime update gang arrested by police those who pretended to be police demand ransom
pune crime update gang arrested by police those who pretended to be police demand ransomSakal
Summary

कोथरुडमधील गांधी भवन येथे "द कश्‍मिर फाईल्स...एक अर्धसत्य' या विषयावरी व्याख्यानाचा कार्यक्रमाच्या समारोपावेळी दोघांनी आरडाओरडा केल्याचा प्रकार घडला.

पुणे - कोथरुडमधील गांधी भवन येथे "द कश्‍मिर फाईल्स...एक अर्धसत्य' या विषयावरी व्याख्यानाचा कार्यक्रमाच्या (Program) समारोपावेळी दोघांनी आरडाओरडा (Shout Out) केल्याचा प्रकार घडला. दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी यासंदर्भात ट्‌विट (Tweet) केले. तर कोणालाही ताब्यात घेतले नाही, तर कार्यक्रमाच्या ठिकाणी जाऊन विरोध दर्शविण्यासाठी परवानगी मागणाऱ्या एका व्यक्तीला समजावुन सांगितल्याचे कोथरुड पोलिसांनी स्पष्ट केले.

युवक क्रांती दलाच्यावतीने गुरुवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास "द कश्‍मिर फाईल्स...एक अर्धसत्य' या विषयावर व्याख्यानाचे आयोजन केले होते. त्यामध्ये "कश्‍मिरनामा, कश्‍मिर और कश्‍मिरी पंडीत' या पुस्तकाचे लेखक व इतिहासकार अशोक कुमार पांडेय हे वक्ते म्हणून सहभागी झाले होते. महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ.कुमार सप्तर्षी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास कार्यक्रमाच्या समारोपाच्यावेळी प्रेक्षकांमधुन निवडक प्रश्‍न मागविण्यात आले, त्यापैकी काही प्रश्‍नांची उत्तरे वक्ते पांडेय देत होते. त्यावेळी प्रेक्षकांमध्ये उपस्थित असलेल्या दोघा जणांनी आरडाओरडा करीत "पांडेय पुर्ण सत्य का सांगत नाहीत' अशी विचारणा केली, त्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी करुन दोघांनाही बाहेर काढल्याची माहिती संयोजक जांबुवंत मनोहर यांनी दिली.

दरम्यान, फडणवीस यांनी या कार्यक्रमासंबंधी ट्‌विट करुन पुणे पोलिस व महाविकास आघाडीवर निशाणा साधला. याविषयी कोथरुड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप म्हणाले, ""गुरुवारी दुपारी एक व्यक्ती संबंधित कार्यक्रमाला परवानगी देऊ नये, अशी मागणी करण्यासाठी आमच्याकडे आले होते. तसे करता येणार नसल्याचे सांगून त्यांचे काही आक्षेप आहेत का ? अशी विचारणा करीत संयोजकांशी त्यांचे बोलणेही करुन दिले. त्यांनी कार्यक्रमात सहभागी होऊन प्रश्‍न विचारण्यासंदर्भात परवानगी मागितली. मात्र त्यामुळे गोंधळ निर्माण होईल, असे सांगितल्यानंतर त्यांना पटले. त्यानंतर पावणे सहा वाजता ते गेले. आम्ही कोणालाही ताब्यात घेतले नाही.''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com