pmrda
pmrdasakal

तळेगावात 'पीएमआरडीए'च्या प्रारूप आराखड्यासंदर्भात जनजागृती मेळावा

या संघर्ष लढ्यात सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन माजी मंत्री बाळा भेगडे यांनी केले.

तळेगाव ढमढेरे: "पीएमआरडीए" (pmrda) ने प्रसिद्ध केलेला प्रारूप विकास आराखडा ग्रामीण भागातील शेतकरी व नागरिकांवर अन्याय करणारा असून, त्यामध्ये प्रचंड चुका आहेत. आराखडयासंदर्भात ज्यांना शंका आहे त्यांनी त्वरित हरकती नोंदवून त्याची पोहोच ठेवावी. शेतकरी व नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी भाजपतर्फे जनजागृती करून आंदोलन करण्यात येत असून या संघर्ष लढ्यात सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन माजी मंत्री बाळा भेगडे यांनी केले.

pmrda
मथुरेच्या बासरीची निपाणीत धून! दहीहंडीवर प्रशासनाची बंदी

तळेगाव ढमढेरे येथे सोमवारी भाजपने आयोजित केलेल्या जनजागृती मेळाव्यात श्री भेगडे बोलत होते. यावेळी श्री भेगडे म्हणाले की, "पीएमआरडीए" ने प्रसिद्ध केलेला प्रारूप आराखडा बिल्डर धार्जिना असून शेतकरी व नागरिकांवर अन्याय करणारा आहे. शेतकरी व नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी भाजपने उभारलेल्या या लढ्यात सर्वांनी सहभागी व्हावे. प्रत्येक गावात प्रारूप आराखड्याचा नकाशा दर्शनी ठिकाणी लावला पाहिजे, पूर्वीची बांधकामे अधिकृत करावीत, हरकती नोंदविलेल्या अर्जाची सुनावणी तालुकास्तरावर करावी अशी मागणी श्री भेगडे यांनी यावेळी केली. पूर्वी गावठाणाला लागून असलेल्या जमिनी निवासी म्हणून वापरात आणता येत होती, परंतु नवीन विकास आराखड्यात तशी कोणतीही तरतूद नाही. शेतकऱ्यांना कोणत्या स्वरूपात नुकसान भरपाई मिळणार याबाबत देखील संदिग्धता असून त्याचा खुलासा होणे गरजेचे आहे.

शेतकऱ्यांच्या अनुत्तरित प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम भारतीय जनता पार्टीतर्फे करण्यात येईल असेही श्री भेगडे यांनी सांगितले.यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद म्हणाले की, प्रारूप आराखड्यातील सार्वजनिक आरक्षण शेतकरी व नागरिकांच्या जागेत न टाकता ते सरकारी गायरानात टाकावे, आमचा विकासाला विरोध नसून अन्यायाला विरोध आहे.

pmrda
पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्याविरुद्ध तक्रार दाखल

अन्यायकारक व बाधित शेतकऱ्यांना घेऊन पीएमआरडीए च्या कार्यालयावर शेतकऱ्यांचा मोर्चा काढणार असल्याचा ईशारा श्री कंद यांनी दिला. यावेळी भाजपचे प्रदेश सदस्य शिवाजीराव भुजबळ, जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, तालुकाध्यक्ष दादा पाटील फराटे, उपाध्यक्ष श्रीकांत सातपुते आदींनी मनोगत व्यक्त केले.

pmrda
आता राधानगरी, दाजीपूर 'जंगल बस सफारी' 300 रुपयात

यावेळी भाजप कामगार आघाडीचे प्रदेशाध्यक्ष गणेश ताठे, रोहिदास उंद्रे, धर्मेंद्र खांडरे, सुदर्शन चौधरी, बाळासाहेब चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष भगवानराव शेळके, सचिव राजेंद्र ढमढेरे, कैलास सोनवणे, जिल्हा कामगार आघाडी अध्यक्ष जयेश शिंदे, उपाध्यक्ष संदीप ढमढेरे, पंडित भुजबळ, युवा मोर्चा अध्यक्ष रोहित खैरे, युवा वॉरियर्स जिल्हाध्यक्ष सुरज चव्हाण, तुळशीराम दुंडे, माऊली बहिरट, रवींद्र दोरगे, अनिल नवले, अविनाश गायकवाड आदी उपस्थित होते. सूत्रसंचालनसरचिटणीस रघुनंदन गवारे यांनी केले. नवनाथ भुजबळ यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com