पुणे : कोरोनाबाधिताच्या उपचारासाठी पिसर्वेकरांनी जमा केले पावणेदोन लाख

पिसर्वे ग्रामस्थांनी एकत्र येत रूग्णासाठी जमविले पावणे दोन लाख.
covid19
covid19sakal media

माळशिरस : आर्थिक परिस्थिती बेताची असणाऱ्या गावातील एका होतकरू तरुण शेतकऱ्यावरती कोरोनाने आघात केला. त्याला उपचारासाठी मोठ्या रकमेची गरज होती. ही गरज लक्षात घेऊन पिसर्वे ग्रामस्थांनी एकत्र येत पावणे दोन लाख रुपयांची लोकवर्गणी जमा करून एक आदर्श समाजासमोर उभा केला आहे.

येथील 37 वर्षीय शेतकरी अशोक दत्तात्रय कोलते यांना पंधरा दिवसांपूर्वी कोरोनाची लक्षणे आढळल्याने त्याने आपली कोरोना चाचणी केली. त्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. सुरवातीला घरीच उपचार सुरू केले. मात्र फरक न पडल्याने त्याला पुढील उपचारासाठी सासवड येथील खासगी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले. त्याठिकाणी उपचारासाठी त्याला मोठ्या प्रमाणावर खर्च येणार असल्याचे निश्चित झाले. त्याच्या कुटुंबीयासमोर उपचारासाठी होणाऱ्या खर्चाचा मोठा प्रश्न उभा राहिला. त्यातच तो त्याच्या कुटुंबात एकमेव कर्ता पुरुष होता. यामुळे घरातील त्याची पत्नी, आई तसेच तीनही लहान मुलांसमोर उपचारासाठी पैसा उभा कसा करायचा हा मोठा प्रश्न निर्माण झाला.

covid19
पुणे : लक्ष्मी, बाजीराव मार्गांवरील ४५ वर्षे जुन्या सांडपाणी वाहिन्या बदलल्या

गावातील या होतकरू तरुणाच्या समोर कोरोनाचे उभे राहिलेले हे संकट व त्याच्या वरती अवलंबून असणारे त्याचे कुटुंब विचारात घेऊन गावातील तरुणांनी व ग्रामस्थांनी एकत्र येत यासाठी निधी गोळा करण्याचे निश्चित केले. ज्याला शक्य असेल त्या पद्धतीने पाचशे रुपयांपासून निधी गोळा करण्यास सुरुवात केली. गावातील संतोष सुरेश कोलते यासारख्या तरुणांनी 25 हजार रुपयांपर्यंतचा निधी जमा केला. यामुळेच पावणेदोन लाख रुपये दोन दिवसांत ग्रामस्थांनी जमा करून अशोकच्या उपचारासाठी देऊन मोठा हातभार लावला. ग्रामस्थांच्या या विधायक कार्याचे परिसरात सर्वत्र कौतूक होत आहे. कोरोनाच्या या भयानक संकटात ग्रामस्थांनी अशाप्रकारे एकी दाखवल्यास निश्चितपणे संकटावर ती मात करू शकतो याचा आदर्श पिसर्वेकरांनी दाखवून दिला.

covid19
बारामती : नियंत्रण सुटल्यानं दुचाकी कालव्यात कोसळली; आजोबा-नातीचा अंत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com