पुणे : 'बाकलीवाल टिटोरीअल'च्या कार्यालयात 27 लाखांची चोरी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 7 एप्रिल 2019

पुणे : आयआयटीचे क्‍लास घेणाऱ्या नामांकित संस्थेतील कामावरुन कमी केलेल्या कर्मचाऱ्यांनी संस्थेचे कार्यालय फोडून रोख रक्कमेसह तब्बल 27 लाख 41 हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला. संस्थेचा लोगो व नावाचा उल्लेख असलेल्या सॅकमधूनच आरोपींनी रोख रक्कम चोरुन नेली. ही घटना रविवारी पहाटे मंगळवार पेठेत घडली. 

याप्रकरणी वैभव बाकलीवाल (वय 37,रा. पिंपळे सौदागर) यांनी समर्थ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन दोन कामगारांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची 'बाकलीवाल टिटोरीअल' नावाची आयआयटीचे क्‍लास घेणारी संस्था आहे. त्यांच्या संस्थेचे मुख्य कार्यालय मंगळवार पेठेतील मालधक्का चौकातील लायन्ट चेंबर्स या इमारतीमध्ये आहे. संस्थेच्या कार्यालयामध्ये दोन कर्मचारी अनेक दिवसांपासून कार्यरत होते. मात्र संस्थेने त्यांना नुकतेच कामावरुन कमी केले होते. शनिवारी रात्री साडेनऊ वाजता काम आटोपल्यानंतर फिर्यादी यांनी कार्यालय बंद केले.

दरम्यान, शनिवारी मध्यरात्री ते रविवारी पहाटेच्या दरम्यान दोन्ही कामगारांनी संस्थेच्या कार्यालयाचे शटर कटावणीच्या सहाय्याने उचकटून आतमध्ये प्रवेश केला. त्यानंतर अकाऊंट विभागातील कपाटांचे कुलूप तोडून त्यामध्ये ठेवलेले विद्यार्थ्यांचे प्रवेश शुल्क व अन्य रोख रक्कम असे 27 लाख 41 हजार 838 रुपयांचा ऐवज पळवून नेला. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक एन.एन.अतकरे करत आहेत. 
 
Web Title: Theft of 27 lakhs in the office of Bakliwal Tutorial